काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी (१३ मार्च) काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास महिलांना सर्वेक्षणाशिवाय आरक्षण दिले जाईल, असे सांगितले. राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत महिलांना मोठ्या थाटामाटात आरक्षण दिले. मात्र त्यानंतर सांगण्यात आले की, सर्वेक्षणानंतर आरक्षण मिळेल आणि 10 वर्षांनंतर सर्वेक्षण केले जाईल. पण, काँग्रेसचे सरकार येताच सर्वेक्षणशिवाय आरक्षण देऊ, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी काँग्रेस पक्ष देशातील लोकांना आकर्षित करण्याचा सतत प्रयत्न करत आहे. निवडणुकीत विजय मिळवायचा असेल तर महिलांमध्ये आपली पकड मजबूत करावी लागेल, असा पक्षाचा विश्वास आहे. त्यामुळेच बुधवारी खुद्द काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी 'महिला न्याय' गॅरंटी जाहीर केली आहे. याअंतर्गत करण्यात आलेल्या घोषणांमध्ये महिलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये निम्मा वाटा दिला जाईल, त्यांना आर्थिक मदत दिली जाईल, असेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, भारत जोडो न्याय यात्रेने महाराष्ट्रात पोहोचलेले राहुल गांधी एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी महागाई बेरोजगारी आणि भागीदारी हे या तीन मुद्द्यांवरच केंद्राची वाटचाल सुरू आहे हे तीन प्रश्न सोडविण्यात केंद्र सरकार अपयशी ठरला आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी धुळ्यातील चौक सभेत केली. भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने खासदार राहुल गांधी यांचे धुळ्यात आगमन झाले. आग्रा रोड वरून त्यांची यात्रा निघाली आग्रा रोडवरील बॉम्बे लॉज चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने खासदार राहुल गांधी यांचे पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले.