महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेस विरोधी बाकांवरच बसणार? शिवसेनेचे 'मुख्यमंत्री'पद हायकमांडच्या हाती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 03:48 PM2019-11-10T15:48:23+5:302019-11-10T15:50:55+5:30
भाजपाची कोअर कमिटीची बैठक नुकतीच संपली. यानंतर पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करण्यात येत आहे.
मुंबई : उद्या भाजपाला सत्तास्थापन करण्यासाठी राज्यपालांनी बोलवाले असल्याने आजचा दिवस राज्याच्या राजकीय वर्तुळात खूप महत्वाचा बनला आहे. एकीकडे भाजपा नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू असताना काँग्रेसचे राज्य प्रभारी मल्लीकार्जुन खर्गे यांनी शिवसेनेला झुलवतच ठेवले आहे.
भाजपाची कोअर कमिटीची बैठक नुकतीच संपली. यानंतर पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करण्यात येत आहे. पुन्हा दुपारी 4 वाजता बैठक घेण्यात येणार आहे. तोपर्यंत शिवसेना नरमली तर ठीक अन्यथा भाजपा विरोधी बाकांवर बसण्याचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दुसरीकडे काँग्रेसने नवनिर्वाचित आमदारांना जयपूरला हलविले आहे. तेथे राज्यातील नेते कालच पोहोचले असून आमदारांशी चर्चा केली आहे. या बैठकीनंतर प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस विरोधी पक्षात बसणार असल्याचे सांगितले. मात्र, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच काँग3ेस राष्ट्रवादीला विरोधी बाकांवर बसण्याचा कौल मिळाल्याचेही त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.
Mumbai: Shiv Sena Chief Uddhav Thackeray arrives at Hotel Retreat in Madh, Malad West to meet party MLAs. pic.twitter.com/Vmw9huTOuy
— ANI (@ANI) November 10, 2019
शिवसेनेकडूनही बैठकांचे सत्र
शिवसेनेने हॉटेल रीट्रीटमध्ये आमदारांची बैठक घेतली असून शह-काटशहाच्या राजकारणाला वेग आला आहे. भाजपाने 4 वाजेपर्यंत शिवसेनेला अल्टीमेटम दिला आहे. मात्र, त्यावर शिवसेना मानायला तयार नसल्याचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या पालखीचे भोई या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे.