शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
3
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
4
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
5
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
6
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
7
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
8
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
9
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
10
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
11
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
12
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
13
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
14
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
15
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
16
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
17
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
18
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
19
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
20
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...

काँग्रेसचा अक्षम्य खोटारडेपणा हा भारतकुमार राउतांचा लेख इतिहासाची मोडतो़ड करणारा

By admin | Published: March 15, 2016 5:24 PM

भारतकुमार राऊत यांचा 'काँग्रेसचा अक्षम्य खोटारडेपणा' हा इतिहासाची मोडतोड व दिशाभुल करणारा लेख वाचला. त्यांनी लेखात खोटे लिहले आहे ज्याला कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही

- संकेत मुनोत 
भारतकुमार राऊत यांचा 'काँग्रेसचा अक्षम्य खोटारडेपणा' हा इतिहासाची मोडतोड व दिशाभुल करणारा लेख वाचला. त्यांनी लेखात खोटे लिहले आहे ज्याला कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही. या संदर्भातलं सत्य मी मांडत आहे.
 
सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडे दयेची भीक मागितली, असे म्हणणे  खोटे नसुन सत्य आहे व त्याचे ऐतिहासिक पुरावेही आहेत.
 
आत्ता लेखकाने सांगितलेले खोटे मुद्दे व खंडण
1. 1931मध्ये झालेल्या गांधी-लॉर्ड आयर्विन कराराच्या वेळी गांधीजींना कारावासाची शिक्षा झालेली होती. या करारात गांधीजींनी देशभर चाललेली सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेण्याचे व दुसऱ्या गोलमेज परिषदेत सहभागी होण्याचे मान्य केले. त्यामुळेच गांधीजी तुरुंगातून मुक्त झाले. याला काय म्हणायचे? ही `दयेची भीक' नव्हती का?
 
सत्य- गांधीजींनी कधीही माफी मागितली नाही किंवा स्वत:ची एकट्याची सुटका करुन घेतली नाही तर हजारो भारतीयांची सुटका करुन घेण्यासाठी सविनय कायदेभंगाची चळवळ तात्पुरती मागे घेतली होती आणि त्यानंतर व्यापक जनआंदोलन करुन इंग्रंजांविरुध्द लढले होते याऊलट सावरकर अंदमानमधुन परत आल्यावर त्यांनी कुठल्याही सशस्त्र वा अहिंसक आंदोलनात सहभाग घेतला नाही शिवाय हजारो क्रांतीकारक अंदमानमध्ये होते त्यांच्या सुटकेसाठी सावरकरांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत.
असहकार आंदोलनाच्यानंतर कोर्टात होणार्या सुनावणीत गांधीजीनी स्वत:ला कठोरात कठोर शिक्षा द्यायला न्यायाधिशाला सांगितले होते तेव्हा त्यांना सहा वर्षाची शिक्षा झाली होती.
 
 
2. चंद्रशेखर आझाद यांना फाशीची सजा झाली, तेव्हा काँग्रेसने कोणता विरोध नोंदवला?
 
सत्य- मुळात चंद्रशेखर आझाद यांना फाशी झालीच नव्हती. चंद्रशेखर आझाद अल्फ्रेड पार्कमध्ये इंग्रजांशी लढताना जेव्हा त्यांच्या तटबंदीत सापडले तेव्हा त्यांनी शेवटची गोळी स्वत:च्या मस्तकात झाडून घेऊन ते शहिद झाले. शिवाय चंद्रशेखर आझाद आणि नेहरु चांगले मित्र होते.
 
3. भगत सिंह, सुखदेव व राजगुरू या तीन देशभक्त क्रांतिकारक तरुणांना ब्रिटिशांनी फाशी दिले. त्यावेळी काँग्रेस काय करत होती? उलट गांधीजींनी भगत सिंह यांच्या कृत्याचा निषेधच केला होता. याचे समर्थन आज काँग्रेस कसे व कोणत्या शब्दांत करेल?
 
सत्य- भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तीन क्रांतिकारकांना इंग्रज साम्राज्यवाद्यांनी १९३१ साली फासावर चढवले. या तिन्ही क्रांतिकारकांचे प्राण वाचावे यासाठी गांधी गव्हर्नर जनरल आयर्विन यास भेटले व फाशीची शिक्षा अमलात न आणण्याची विनंती केली. शिक्षेच्या एक दिवस आधी त्यांनी आपले सर्व भाषिक कौशल्य पणाला लावून एक पत्र लिहून शिक्षा माफ करण्याची विनंती केली, पण त्यास न जुमानता फाशी अंमलात आणली गेली. इंग्रजांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल गांधींना दोषी धरण्याचे अजब तर्कशास्त्र गांधी विरोधकांनी विकसीत केले आहे. 
भगतसिंग सशस्त्र क्रांतीकारक व कम्युनिस्ट होता म्हणून तो गांधींच्या विरोधात होता आणि म्हणून तो हिंदूत्ववादी होता, असा प्रचार धादांत खोटा होता. भगत सिंग आणि त्याच्या सहकार्यांना वाचविण्याचा जो कांही प्रयत्न केला तो गांधी-पटेल-नेहरूंनीच केला मात्र आज भगतसिंग आमचा आहे म्हणणा-या कोण्याही हिंदुत्ववादी पक्षातील नेत्यांनी असा कोणताही प्रयत्न केला नाही आणि  महत्वाचे म्हणजे भगतसिंग आणि त्याचे सहकारी हौतात्म्यासाठी खूपच अधीर झाले होते . त्यांना माफी नकोच होती ,म्हणून तर त्यांनी खटल्या दरम्यान बचावाचा प्रयत्न केला नाही.
शहीदे आजम भगतसिंहनी आपल्या 'नये नेताओंके अलग अलग विचार' या पुस्तकात नेताजी बोसना emotional Bengali, a devotee of the ancient culture of India तर नेहरुंना  internationalist and revolutionary असे म्हटले आहे.
 
4. अफझल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याला वेढा घालून गावागावांत नासधूस, अत्याचार व जाळपोळ चालवली, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला भेटण्याची तयारी दाखवलीच. पण आम्ही आपल्याकडे यायला घाबरतो. आपणच प्रतापगडावर यावे, असा निरोप पाठवला. ही युद्धाची व्यूहरचना होती. यालाही काँग्रेस दयेची भीक मानणार का? 
 
सत्य- सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलनाच होऊ शकत नाही. आग्र्याहुन सुटुन आल्यावर शिवाजी महाराज काय शांत बसले नव्हते त्यांनी त्यानंतरही अनेक लढाया लढल्या आणि गड जिंकले होते ते शेवटपर्यंत रयतेचे राज्य स्थापन व्हावे यासाठी लढत होते 
याऊलट अंदमानला जाण्यापुर्वी सावरकर थोडे विज्ञानवादी सुधारणावादी असले तरी ब्रिटीशांची माफी मागुन सुटुन आल्यावर भारतात आल्यावर त्यांनी कुठल्याही सशस्त्र वा अहिंसक स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला वाही  धार्मिक तेढ निर्माण करणारे, माणसा माणसात जातपात धर्म प्रांत यावरुन भांडण लावणारे, द्विराष्ट्रवादाचा सिध्दांत मांडुन भारत पाकिस्तान फाळणीची बीजे पेरणारे, गांधीहत्येचा कट रचणारे , देशातील गोरगरीबांचे शोषण करणार्या संस्थानिकांना साथ देणारे, देशाच्या एकीकरणाला आणि संस्थानांच्यस विलिनीकरणात अडथळे निर्माण करणारे होते, शिवाजी महाराजांच्या सर्व धर्मांना आदर करण्याच्या व स्त्रीयांचा आदर करण्याच्या चांगल्या गुणांना सावरकरांनी विकृती( सद्गुण विकृती )म्हटले आहे. सावरकरांनी आपल्या सहा सोनेरी पाने पुस्तकात खालील शब्द लिहले आहे.
“कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक वेळ” एवढच शिवाजी महाराजांबद्दल मी बोलू शकतो. ज्यांनी मनुस्मृती लिहीली त्यांच्याबद्दल पन्नास पाने आणि शिवाजी महाराजांबद्दल दिड पाने ही सहा सोनेरी पाने ह्या पुस्तकात वाचायला मिळतात.
 
 
5 - काँग्रेसने वीर सावरकरांचा उल्लेख `भाजपचे' असा केला आहे. त्यांनी आधी इतिहासाचे किमान वाचन करावे, अशी अपेक्षा आहे. वीर सावरकरांच्या काळात कार्यरत असलेल्या भारतीय जनसंघ वा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याशी त्यांचा कधीही सुसंवाद नव्हता. या मंडळींची ध्येय-धोरणे व कार्यपद्धती सावरकरांना मान्य नव्हती. म्हणूनच त्यांनी स्वत:ची हिंदु महासभा या संघटनेची रचना केली. या संघटनेने तेव्हाच्या जनसंघाविरुद्ध निवडणुकाही लढवल्या होत्या.
 
सत्य- गांधी कॉंग्रेसचे आणि सावरकर बीजेपीचे हे खरे नाही. गांधी हे विश्वव्यापक आणि सर्वसमावेशक व्यक्तिमत्व आहे भारतातच काय परदेशात ओबामा, मंडेला ही गांधीजीना आपला गॉडफादर म्हणतात. याऊलट सावरकरांचे एकांगी विचार कोणत्याच पक्षाला झेपलेले नाहीत ते हयात असतांनाही त्यांना अनुयायी मिळाले नाहीत. याऊलट गांधींना प्रेरणा माणणारा वर्ग तेव्हाच काय आत्ताही आहे. जगभर मलाला, दलाई लामा, ओबामा,मंडेला, त्स्यांग त्सु कि असे लाखो लोक गांधीना आपली प्रेरणा मानतात.
 
6 - शेवटी एक स्मरण: काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या इंदिराजी गांधी यांनी मुंबईत उभ्या राहिलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकासाठी स्वत:च्या वैयिक्तक खात्यातून रु. 5 हजारचा चेक तेव्हाचे स्मारकाचे अध्यक्ष कै. जयंतराव टिळक यांच्या स्वाधीन केला होता. इंदिराजींच्या या कृतीबद्दल आताच्या काँग्रेसला काय म्हणायचे आहे?
 
सत्य- आणीबाणीच्या काळात सर्व समाजवादी, गांधीवादी लोक ईंदिरा गांधीच्या विरुद्ध बोलत असतांना सरसंघचालक देवरस तुरुंगात असतानाही इंदिरा गांधी यांची स्तुती करणारी पत्रे त्यांना लिहीत होते आणि  त्यामुळे इंदिरा गांधींनी 5000रु. देणगी देणे यात नवल ते काय?
चारित्र्य, नैतिकता, संस्कृती इत्यादी गोष्टी संघ बोलत असला तरी आपलं उद्दिष्ट गाठण्यासाठी रणनीती आखताना व त्याबरहुकूम वागताना अनैतिकता, अप्रामाणिकपणा, संधिसाधूपणा इत्यादीचं हिंदुत्ववाद्यांना कधीच वावडं नसतं. 
प्रेयसीवर ऍसिड फेकणाऱ्या तरुणाला जर प्रेमवीर म्हणायचं असेल तर सावरकरांच्या आदेशाप्रमाणे गांधीजीचा खुन करणाऱ्या नथुरामलाही देशभक्त म्हणता येईल.
कस आहे भगतसिंह-राजगुरु फ़ासावर चढत होते .
कोट्यावधी सर्वसामान्य भारतीय माणसे प्रांत , प्रदेश ,संस्थान ह्या सगळ्या सीमा पार करून गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय म्हणून एक होऊन इंग्रजांशी लढत होते.
सुभाषबाबु आझाद हिंद सेनेतुन सशस्त्र लढा देण्याचा प्रयत्न करत होते
बाबासाहेब दलित स्वातंत्र्यासाठी झगडत होते ....... चाफ़ेकर , खुदीराम बोस, चंद्रशेखर आझाद इथिपासुन तिथपर्यंत लोक येन केन प्रकारे देशासाठी सर्वस्व अर्पण करत होते त्या वेळी हे फक्त हातात काठ्या घेवुन पाडव्याचे संचलन करत होते
लोकांना देवा धर्मावरुन जातीपातीवरुन भडकवत होते 
 तेव्हा संघटना म्हणून हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा मुस्लिम लीग अस नाव लावणार्या आणि स्वतःला सामाजिक संघटना म्हणवणाऱ्या  या संघटना , संघटना म्हणून ह्या लढाईत आपल काय योगदान देत होत्या ?
मग ज्या लढाईत आपण भाग घेतलाच नाही त्या लढाईत पुढे असणाऱ्या नेत्यांचे असणारे मतभेद ( जे वैचारिक असतील , मार्गाबद्दल असतील पण ध्येयाबद्दल कधीच नव्हते ) चव्हाट्यावर आणून चघळत बसण्याचा नैतिक हक्क ह्या संघटनांना कसा मिळतो ?
आपल्याच मनाला आपण प्रश्न विचारले तर उत्तर सापडतील पण कबूल करण्याची हिंमत असायला पाहिजे.
(लेखकाचा ई-मेल आयडी - changalevichar1@gmail.com)