- यदु जोशी
मुंबई : आघाडी सरकारच्या चांगल्या कामांचे कौतुक करण्याचे सोडून पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीबाबत संशयाचे भूत निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
प्रश्न - राष्ट्रवादीला लक्ष्य करण्यामागे त्यांचा काय हेतू होता?
पवार - ते त्यांनाच माहिती. आमची कोंडी करून त्यांना दिल्लीत महत्त्व वाढवून घ्यायचं असेल. एक सांगतो, राष्ट्रवादीचे मंत्री काँग्रेसच्या मंत्र्यांपेक्षा कर्तृत्ववान होते. जलद निर्णय घेत होते. कर्तृत्ववान माणसांभोवती असा संशय अनेकदा निर्माण केला जातो. माङयाविरुद्धही भूखंड प्रकरणी आरोपांचा धुराळा उठला होता. तेव्हा आणि आताही आम्हाला त्याचा फटका बसला. पण काय झालं? माङयावरील आरोप कोर्टात कुठेही टिकले नाहीत, आताही तसंच झालं आणि होईल.
प्रश्न - घोटाळा म्हटलं की राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांचे नाव कसे समोर येते?
पवार - काँग्रेसकडील खात्यांवर आम्ही कधीही आरोप केले नाहीत. आम्ही ते सहज करू शकलो असतो. पण आघाडी म्हणून आम्हाला ते करायचे नव्हतं. काँग्रेसकडील खात्यांबाबत चव्हाण कधी काही वाईट बोलले नाहीत. याचा अर्थ तेथे आलबेल होते का?
प्रश्न - पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार एकमेकांवर जोरदार शाब्दिक हल्ले करीत आहेत. दोघांना आपला सल्ला काय?
पवार - आपापल्या पक्षाची भूमिका, कार्यक्रम त्यांनी मांडावा. एकमेकांवर टीका टाळावी. मी प्रचारात वैयक्तिक टीका करणार नाही, आधीही केलेली नव्हती.
प्रश्न - राष्ट्रवादीसमोर विश्वासार्हतेचे संकट आहे असे वाटते का?
पवार - हे चित्र खरे नाही. ते आमच्या विरोधकांनी आणि मीडियाने तयार केलेले आहे. विश्वासार्हतेचे काहूर माजवून आमची कोंडी केली जाते. आमची भाजपाशी छुपी दोस्ती असल्याचा आरोप केला जातो. 5क् वर्षाच्या सार्वजनिक आणि राजकीय जीवनात शरद पवार या व्यक्तीनं एकदाही जातीयवादी पक्षांशी सोबत केलेली नाही. 1978 मध्ये मी पुलोदचा प्रयोग केला पण तेव्हा जनता पक्षाची साथ मी घेतलेली होती. आम्ही 4क्-5क् वर्षे विश्वासार्हता कायम राहण्यासाठी धडपड करायची आणि कोणी लेखणीच्या एका फटका:यानं त्यावर प्रश्नचिन्ह उभे करायचे हा आमच्यावरील अन्याय आहे. राज्याच्या कोणत्याही कोप:यात आज मी गेलो तर प्रचंड प्रतिसाद अन् आदर मिळतो ही विश्वासाहर्ताच तर आहे. मी काँग्रेसमधून काही वेळा बाहेर पडलो पण गांधी-नेहरुंचा विचार सोडला नाही. विचारांशी तडजोड केली नाही.
प्रश्न - महाराष्ट्रात आघाडीचे पर्व संपले?
पवार - आघाडी पर्व येऊच नये अशी माझी अपेक्षा आहे. आम्ही स्वबळावर सत्तेत येऊ असे वाटते. राष्ट्रवादीला स्वबळावर सत्ता द्या, असे आवाहन मी तमाम मतदारांना करतोय. कारण, आघाडीच्या सरकारमध्ये मर्यादा येतात. अशा सरकारमध्ये तडजोडी कराव्या लागतात. सरकारचं नेतृत्व आपल्याकडे नसेल तर जनहिताच्या संकल्पना राबविता येत नाहीत. म्हणून राष्ट्रवादीला पूर्ण बहुमतानं सत्ता देण्याचं आवाहन मी राज्यातील जनतेला करतोय. आम्ही अपयशी ठरलो तर जनतेनं आम्हाला दूर करावं.
प्रश्न-राष्ट्रवादीचा अजेंडा काय आहे?
पवार - शेती आधुनिक करायची आहे. पिण्याचे स्वच्छ अन् मुबलक पाणी, विकेंद्रीत औद्योगिकरण, सेवा क्षेत्रचा विकास, झोपडपट्टीमुक्त शहरे, जनहिताच्या विविध क्षेत्रत गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारी यंत्रणा उभारणो, दलित, आदिवासी अन् मुस्लिमांच्या विकासावर भर दिला जाईल. सर्वाना सोबत घेऊन विकास करू. काही राजकीय पक्षांकडून मराठी-गुजराथी, मराठी-परप्रांतिय असे वाद उकरले जातात. ते योग्य नाहीत. बिगर मराठी जनांचेही राज्याच्या विकासात योगदान आहे. असे वाद राज्याला परवडणारे नाहीत.
प्रश्न - तुम्ही राज्यात परत येणार का?
पवार - नाही! आता मला सत्तेच्या राजकारणात यायचं नाही. राष्ट्रवादीचं सरकार आलं तरी सत्तेत हस्तक्षेप न करता मार्गदर्शनाची भूमिका घेईन. सरकारच्या कामगिरीवर माझी निगराणी असेल. आमच्या अनुभवाचा फायदा राज्य सरकारला होईल.
होय! पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादीला जाणिवपूर्वक टार्गेट केलं. 1क् वर्षात राज्यात केवळ क्.क्1 टक्केच सिंचन वाढलं, या मुळात चुकीच्या माहितीचा गवगवा करण्यात आला. चितळे समिती, श्वेतपत्रिकेद्वारे राष्ट्रवादीला आरोपीच्या ंिपंज:यात बसविण्याचाही प्रयत्न झाला.
दोन्हींमध्ये कुठलाच घोटाळा समोर आला नाही. मग चव्हाण यांनी नेमकं काय साधलं? त्यांचं वागणं परिपक्वतेचं आणि सुसंस्कृतपणाचं नव्हतं, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.