गडचिरोली : नक्षलवादी दुर्गम भागात पत्रके व बॅनर लावून सरकारविरोधात विखारी प्रचार करीत असतात. हीच नीती आता पोलिसांनी अवलंबिली आहे. पोलीसही आता दुर्गम भागात शासकीय योजनांचा असाच प्रचार करू लागले आहेत. याचा लोकांमध्ये चांगला परिणाम दिसून येत आहे.नक्षलवादी नेहमीच पोलिसांच्या विरोधात पत्रके काढून खोटा प्रचार करतात. चकमकीनंतर पत्रके काढून पोलिसांवर टीका करतात. कार्यक्रमांची माहिती बॅनरद्वारेच देतात. लाल कापडावर लिहिलेले हे बॅनर दुर्गम भागात लागले की नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होते, हा आजवरचा अनुभव आहे. आता पोलिसांनीही असेच बॅनर व पत्रके छापून अतिदुर्गम भागात लावण्यास सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)
जागृतीसाठी पोलिसांकडून नक्षलनीतीचा अवलंब
By admin | Published: September 23, 2015 1:13 AM