ठाणे : भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन उल्हास उपखा-यातील पाण्याचा एकात्मिक जल आराखडा तयार करण्यात येत आहे. या त्याला अंतिम मान्यता मिळण्यापूर्वी २३ जानेवारी रोजी येथील कोपरी कॉलनीतील सिंचन भवन येथे सकाळी ११ ते ५ या वेळेत जन सुनावणीसह कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.उल्हासनदीच्या या खोºयातून ठाणे जिल्ह्यातील बहुतांशी शहराना देखील पाणी पुरवठा होत आहे. याशिवाय रायगड, पुणे, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यातील तालुक्यांचा पाणी पुरवठा देखील या उपखोºयातून होत आहे. भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन येथील पाण्याचा एकात्मिक जल आराखडा तयार करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जलसंधारण, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, कृषी, महाराष्ट्र जीवन, प्राधिकरण उद्योग, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आदींकडून सद्य:स्थितीतील व भविष्यकालीन म्हणजे २०३०पर्यंतची पाण्याची गरज विचारात घेवून हा एकात्मिक जल आराखडा तयार करण्यात आला आहे.या उल्हास खो-यामधून ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर, ठाणे, उल्हासनगर, पालघरच्या वसई तालुक्यास पाणी पुरवठा होत आहे. याशिवाय रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, पनवेल. तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ तालका. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात या उल्हास नदीच्या खो-यातील पाण्याचा वापर केला जात आहे. यासाठी पश्चिम वाहिनी नद्या खो-याची विभागणी सव्वीस उपखो-यामध्ये करण्यात आली असून या प्रत्येक उपखो-याचा प्रारु प जल आराखडा तयार करण्यात आला आहे.उपखोºयातील भूपृष्ठावरील व भूगर्भातील पाण्याचा एकात्मिक जल आराखडा तयार करणे, जलसंपत्ती संरक्षण व त्यामध्ये निरंतर सुधारणा करणे ही या जल आराखड्याची प्रमुख उद्दीष्टे आहेत. त्यानुसार कोकणातील उल्हास खो-याचा प्रारूप जल आराखडा तयार करण्यात आलेला आहे. यासाठी जनसुनावणी व कार्यशाळेसाठी संबंधितानी उपस्थित राहून आपली मते नोंदवण्याचे आवाहन येथील ठाणे पाटबंधारे मंडळाने केले आहे.
पाण्याची गरज लक्षात घेत उल्हासच्या उपखो-यातील पाण्याचा एकात्मिक जल आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 7:31 PM
या उल्हास खो-यामधून ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर, ठाणे, उल्हासनगर, पालघरच्या वसई तालुक्यास पाणी पुरवठा होत आहे. याशिवाय रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, पनवेल. तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ तालका. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात या उल्हास नदीच्या खो-यातील पाण्याचा वापर केला जात आहे.
ठळक मुद्दे भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन उल्हास उपखा-यातील पाण्याचा एकात्मिक जल आराखडा ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर, ठाणे, उल्हासनगर, पालघरच्या वसई तालुक्यास पाणी पुरवठा होत आहे रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, पनवेल. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ तालकानाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात या उल्हास नदीच्या खो-यातील पाण्याचा वापर