शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 
2
JMM चे ३५ उमेदवार ठरले; कल्पना सोरेनही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
3
सीनिअर सिटिझन्ससाठी सुपरहिट आहे Post Officeची 'ही' स्कीम, ५ वर्षात केवळ व्याजातूनच मिळतील ₹१२,३०,०००
4
आजचे राशीभविष्य : मित्रांकडून आणि विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल, व्यापारात फायदा होईल
5
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
6
"मी काळवीटाची शिकार केली नाही!" बिष्णोईच्या धमक्यांदरम्यान सलमान खानचा व्हिडीओ व्हायरल
7
गुरुपुष्यामृत योग: दत्तगुरु-लक्ष्मीकृपेचा सुवर्ण योग; ‘या’ ६ गोष्टी करा, अमृत पुण्य मिळवा!
8
'केजीएफ' स्टार यश 'रामायण' मध्ये साकारणार रावणाची भूमिका, स्वत:च कन्फर्म करत म्हणाला...
9
गुरुपुष्यामृत योग: १० राशींना शुभ-लाभ, धनलक्ष्मीची अपार कृपा; अचानक धनलाभ, दिवाळीला भरभराट!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला?
11
संशयास्पद वाटले तर लगेच जप्ती! निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांच्या तपास यंत्रणांना सूचना
12
१० व्या महिन्यात झाली डिलिव्हरी, सुप्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी झाली आई! सर्वांकडून अभिनंदन
13
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी
14
ठाण्यात उद्या होणार जोरदार शक्तिप्रदर्शन; गुरुपुष्यामृत योग साधत बडे नेते भरणार अर्ज
15
शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर; ९ मंत्र्यांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार
16
मनसेचे ४५ उमेदवार ठरले! मुंबईत १८ तर ठाण्यातून ७ उमेदवार; अमित ठाकरे माहीममधून रिंगणात
17
शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदारांचे ९.१९ लाख कोटी रूपये दिवसभरात स्वाहा!
18
शेकापची मोठी खेळी, सहा उमेदवार जाहीर; महाविकास आघाडीत असतानाही जाहीर केली नावे
19
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
20
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर

ज्ञानोबा-तुकोबांचा समाज तोडण्याचे षडयंत्र

By admin | Published: May 28, 2015 12:44 AM

सध्या महाराष्ट्रात ज्ञानोबा-तुकोबांचा समाज तोडण्याचे षड्यंत्र चालू आहे. हा समाज तुटला तर महाराष्ट्र रसातळाला जाईल,

पुणे : सध्या महाराष्ट्रात ज्ञानोबा-तुकोबांचा समाज तोडण्याचे षड्यंत्र चालू आहे. हा समाज तुटला तर महाराष्ट्र रसातळाला जाईल, असे स्पष्ट करीत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी ‘मराठ्यांचा इतिहास’ जातीपातीत नेला तर अहिष्णू, हिंसक समाजाला तोंड द्यावे लागेल, असा गर्भित इशाराहीदिला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या १०९व्या वर्धापनदिनानिमित्त बुधवारी निवारा सभागृहात समारंभ झाला. त्यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सन्मान पुरस्कार ज्येष्ठ कादंबरीकार रंगनाथ पठारे यांना व भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार मधू नेने यांना देऊन गौरविण्यात आले. याशिवाय राजा फडणीस पुरस्कृत उत्कृष्ठ मसाप शाखा फिरता करंडक मसापच्या सासवड शाखेस प्रदान करण्यात आला. तर श्यामराव पाटील आणि पद्माकर कुलकर्णी मसाप कार्यकर्ता पुरस्काराचे मानकरी ठरले. धर्माधिकारी म्हणाले, संत ज्ञानेश्वर ते कवी ग्रेसांपर्यंत मराठी भाषेतील राकट आणि कोमलपणा दिसला आहे. मराठी जतन करायची असेल तर नव्याची कास धरावी लागेल. जीवनाच्या सर्व क्षेत्रात मराठी भाषेचा ठसा उमटला तर ती नक्कीच समृद्ध होईल. मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न होत आहेत, पण मुळातच मराठी अभिजातच आहे. प्रतिभावंत माणसे निपजली म्हणूनच मराठी भाषा समृद्ध झाली. सत्काराला उत्तर देताना रंगनाथ पठारे म्हणाले, मराठी भाषेच्या ऱ्हासासाठी राज्यकर्त्यांपेक्षा सामान्यजनच जबाबदार आहेत. प्रास्ताविक प्रकाश पायगुडे, सूत्रसंचालन डॉ. कल्याणी दिवेकर यांनी केले. (प्रतिनिधी)पठारेंना ज्ञानपिठ मिळावे४प्रा. पठारे हे मराठी साहित्यातील ज्येष्ठ साहित्यिक आहेत, असे सांगत धर्माधिकारी यांनी यावेळी पठारे यांना ‘ज्ञानपिठ पुरस्कारा’ने सन्मानित करावे अशी इच्छा व्यक्त केली. इतकेच नव्हे तर तांम्रपटच्या ताकदीच्या कादंबरीला ‘नोबेल पुरस्कार’ मिळावा असे ही सांगितले. यामध्ये कोणत्याही मराठी साहित्यिकाने खोडा घालूनये असे बोलून कानही टोचले.नातीला प्रवेश नाकारला४ज्येष्ठ साहित्यिक प्रा.रंगनाथ पठारे यांच्या नातील भगवत गीतेतील अध्याय येत नसल्याने ज्ञानप्रबोधीनी शाळेने प्रवेश नाकारल्याची जाहीर खंत आज पठारे यांनी बोलून दाखवली. ते म्हणाले, जो अध्याय आज्याला येत नाही, बापाला येत नाही तो चार वर्षाच्या पोरीला कसा येणार अशीही टिपणी त्यांनी यावेळी केली.