शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

मतदारसंघ, हिंगोली : युतीचा उमेदवारच निश्चित होईना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 5:55 AM

हिंगोली या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे सध्याचे खा.राजीव सातव यांच्यासमोर शिवसेना-भाजपा युतीचा उमेदवार कोण, हेच अद्याप नक्की नाही.

- विजय पाटील  हिंगोली या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे सध्याचे खा.राजीव सातव यांच्यासमोर शिवसेना-भाजपा युतीचा उमेदवार कोण, हेच अद्याप नक्की नाही. मुळात या दोन पक्षांत युती होईल, की ते स्वतंत्रपणे लढतील, हेही ठरलेले नाही. त्यामुळे भाजपा व शिवसेनेचे डझनभर इच्छुक मतदारसंघाची वारी करीत आहेत.गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून ही जागा घेऊन काँग्रेसने कळमनुरीचे तत्कालीन आ. राजीव सातव यांना मैदानात उतरविले होते. शिवसेनेचे खा. सुभाष वानखेडे यांच्याशी झालेल्या लढतीत मोदी लाटेतही महाराष्ट्रात टिकाव धरलेल्या काँग्रेसच्या दोघांपैकी खा. सातव हे एक होते.मागील पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. युतीत ही जागा ज्या सेनेकडे जाईल, असे वाटते. त्यांच्याकडे प्रबळ चेहरा नाही. त्यामुळे काही दिवसांपासून वसमतचे सेनेचे आ. जयप्रकाश मुंदडा यांनी प्रयत्न चालवले आहेत. उमरखेडचे माजी आ. प्रकाश पाटीलही अधूनमधून चेहरा दाखवत असतात. मात्र परभणीचे आ.राहुल पाटील, हदगावचे आ. नागेश पाटील आष्टीकर व नांदेडचे आ. हेमंत पाटील हेही मतदारसंघावर डोळा ठेवून आहे. युती झाल्यास भाजपाला ही जागा मिळेल की नाही, याची काहीच शाश्वती नाही. मात्र मागील लोकसभेनंतर तीन माजी खासदार भाजपात गेले. यात सुभाष वानखेडे, सूर्यकांता पाटील व अ‍ॅड. शिवाजी माने यांचा समावेश होता. हे तिघेही लोकसभा उमेदवारीवर दावा करीत आहेत.यापैकी वानखेडे आता हदगाव विधानसभेकडेच लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. मात्र उर्वरित दोघांना लोकसभा उमेदवारीची आस आहे. या तिघांमध्येच तगडी स्पर्धा असताना भाजपा म्हणजे विजयाचे गणित असे समजून इतरही अर्धा डझन लोकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. मात्र उमेदवारी मिळण्यापूर्वीच ते बाद होतील, असे दिसते.या निवडणुकीत खा. सातव यांना टक्कर द्यायची झाल्यास विरोधकांना वेळीच उमेदवार ठरवावा लागणार आहे. मात्र वरिष्ठ स्तरावर युतीच्या चर्चेचे गुºहाळ सुरू आहे. त्यातच जागा शिवसेनेची असताना भाजपाचीच मंडळी जोरात कामाला लागल्यासारखे दाखवत असल्याने शिवसेनाही संभ्रमात आहे. शिवसेनेने दावा मात्र सोडलेला नाही. युती नाही झाली तर तयारी असावी, यासाठी भाजपाच्या आखलेल्या व्यूहरचनेचा हा भाग असू शकेल. अन्यथा या इच्छुकांपैकी काही नाहकच अपक्ष वा बंडखोर म्हणून डोकेदुखी करायला मैदानात उतरण्याची भीती नाकारता येत नाही. मागच्या वेळी २२ उमेदवार रिंगणात होते. नामसाधर्म्य असलेल्या अनेकांना पक्षीय तिकिटावर उभे केले होते. अशांनीही मोठी मते खाल्ली. त्यामुळे अवघ्या १६३२ मतांनीच राजीव सातव विजयी झाले होते. जातीय समीकरणासाठीही काहींचा उपयोग घेतला जाऊ शकतो.सध्याची परिस्थितीमागच्या वेळी सेनेतील काहींनी काँग्रेसला मदत केली होती. त्यात बरीच फाटाफूट झाली. सेनाही बॅकफूटवर असून मागच्या लोकसभेपूर्वी वादाचे व सेनेच्या पराभवाचे कारण ठरलेल्या जि.प.त राकाँ-काँग्रेससोबतच सत्तेत आहे. गेल्या वेळी आपली हक्काची जागा काँग्रेसने हिसकावल्याची नाराजी राष्ट्रवादीतील काही मंडळीत होती. ती यंदा दिसत नाही.मतदारसंघाची रचना विचित्र आहे. यवतमाळ, नांदेड व हिंगोली या तीन जिल्ह्यांतील सहा विधानसभा मतदारसंघात प्रचार करायचा झाल्यास पूर्वतयारी गरजेची आहे. आताही खासदार असणे ही सातव यांची ही जमेची बाजू. विरोधकांना चेहरा ठरत नसल्याने अडचण.मागच्यावेळीही काँग्रेसमध्ये शिवसेनेप्रमाणेच गटबाजी होती. मात्र ती कमी होती. आता ती वाढली. शिवाय इतरही पक्षांमध्ये याची काही कमी नाही. हा गोंधळ निवडणुकीवर कसा परिणाम करणारा ठरतो, यातच विजयाची गणिते सामावली आहेत.इतरत्र जोरदार चर्चा असलेल्या वंचित बहुजन विकास आघाडीचे इकडे वारे नाही. तर ऐनवेळी काही पक्ष नशीब अजमावतात. कुणी बडा नेता गळाला न लागल्यास लढायची म्हणून निवडणूक लढणार, असे चित्र आहे.२०१४ मध्ये मिळालेली मते4,67,397राजीव सातव(काँग्रेस)4,65,765सुभाष वानखेडे(शिवसेना)25,145चुन्नीलाल मोहन जाधव(बसपा)14,986डी.बी. नाईक(माकप)6,126उत्तम पांडुरंग राठोड(बमुपा) 

टॅग्स :HingoliहिंगोलीElectionनिवडणूकRajeev Satavराजीव सातव