- नागपुरात मुख्य कार्यक्रम
मुंबई : राज्यभरात गुरुवारी (२६ नोव्हेंबर) ‘संविधान दिन’ साजरा करण्यात येणार असून, त्याचा मुख्य कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपुरात होणार आहे.नागपूरमधील यशवंत स्टेडियम येथे सकाळी ९ वाजता होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात सुमारे सव्वा लाख लोक संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करणार आहेत. तसेच राज्यातील सर्व शासकीय कार्यालये, पोलीस ठाणी, शाळा महाविद्यालये, विद्यापीठे, महापालिका/ नगरपालिका या ठिकाणी विद्यार्थी व नागरिक संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करणार आहेत. याशिवाय सर्व ग्रामपंचायतस्तरावर विशेष ग्रामसभांमध्ये उद्देशिकेचे वाचन करण्यात येणार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोेले यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)