शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

वैतरणा, पिंजाळवर बंधारे बांधा

By admin | Published: May 14, 2017 2:25 AM

शेतकऱ्यांसाठी आरक्षित असलेले वैतरणेचे पाणी कोकाकोला १५ किमी अंतरावरून घेते मग पुरेसा निधी उपलब्ध केला

वसंत भोईर । लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : शेतकऱ्यांसाठी आरक्षित असलेले वैतरणेचे पाणी कोकाकोला १५ किमी अंतरावरून घेते मग पुरेसा निधी उपलब्ध केला तर येथील नागरिकांना ते का मिळू शकणार नाही. प्रस्तावित प्रस्तावित पिंजाळ प्रकल्पातील काही टक्के पाणी या तालुक्याला मिळाल्यास पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागणार नाही. तालुक्यातील नद्यांवरून १० कि.मी. अंतरावर बंधारे बांधून पाणी अडविले तर केवळ पिण्याचाच नाही तर शेतीच्या पाण्याचाही प्रश्न सुटेल. मात्र लोकप्रतिनिधी क्रियाशील नसल्यामुळे तालुका तहानलेला आहे.वाडा: तालुक्याला पाच नद्यांचे वरदान लाभले आहे. पंरतु पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने तो तहानलेला आहे. हा प्रश्न कायमस्वरुपी सुटण्यासाठी प्रत्येक नदीवर १० कि.मी. वर बंधारे बांधल्यास व तालुक्यात १६८ खेडी व २०० हून अधिक पाडे आहेत. ८६ ग्रामपंचायती आहेत. आजमितीस तालुक्याची लोकसंख्या दोन लाखांच्या आसपास आहे. येथे औद्यागिकीकरणाला वेग वाढत असून लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र लोकसंख्येच्या मानात पाणी समस्येचे निराकरण होत नाही. तालुक्याला बारमाही मुबलक पाणी असणाऱ्या वैतरणा, पिंजाळ, तानसा, गारगाई व देहर्जे या पाच नद्यांचे वरदान लाभले आहे. मात्र पाण्याचा लाभ या तालुक्याला मिळवून देणारे लोकप्रतिनिधी न मिळाल्याने पाण्याची समस्या सुटू शकलेली नाही. यासाठी आदीवासी विकासमंत्री विष्णू सवरा व इतर सर्वच राजकीय पक्षांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.मागील वर्षी खासदार हेमंत गोडसेकडून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आदर्श घ्यावा वाडा तालुक्यातील पिंजाळ व गारगाई नदीचे वाया जाणारे पाणी देव नदीत टाळण्यासाठी आग्रही असणारे तेथील खासदार गोडसे यांची तसा प्रस्ताव बनवून तो केंद्र सरकारला सादर करून केंद्र सरकारकडून त्यांचे सेर्वेक्षण देखील सुरू होते. नाशिकचे खासदार असा प्रस्ताव सादर करून पाणी टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र पालघर जिल्ह्यातील वाया जाणाऱ्या पाण्याचा उपयोग करण्याचा प्रस्ताव लोकप्रतिनिधींना सूचत नाही हे दुर्दैव आहे, अशी टीका श्रीकांत भोईर यांनी केली. उद्योजकांची बाजूही लक्षात घ्यावीऔद्योगिकरण व त्यामुळे वाढलेल्या वस्तीला पाणी पुरवठा करणे ही अनेक गावांची समस्या बनली आहे. कारखानदारांना सरकारने पाणी दिले नाही. त्यामुळे त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली कारखानदारी धोक्यात आली आहे. केवळ पाण्यामुळे उत्पादन कमी होत आहे असे उद्योजकांचे म्हणणे आहे.या गावांचे प्रस्ताव प्रलंबितदुर्गम भाग रोकरे पाडा, जांभूळपाडा, साखरशेत, आणेवाडी, दिवेपाडा या गावांना टँकरने पाण पुरवठा चालू करण्यात आला आहे तर येणारा उज्जैनी, वळवी पाडा, थापरपाडा, पाचघर, निळमाळ, तोरणे, चिंचेपाडा , रोजगार, ककडपाडा, बेलखाचर, कुसवडे, वांगणपाडा, मोरसेपाडा, ठाकूरपाडा, फणसपाडा, वारलीपाडा या गावांना पाणीटंचाई असून त्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित असून त्यांची मान्यता मिळाली की, लगेचच या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरूवात केली जाईल, अशी माहिती पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे शाख अभियंता प्रमोद भोईर यांनी दिली. खोदाई मर्यादा ३५० फूट करासरकारकडून कूपलिकांची खोदाई २०० फूटांपर्यंत करण्याचा नियम आहे. व सध्या पाण्याची पातळी खोल गेल्याने काही ठिकाणी २०० फुटांपर्यंत पाणी लागत नाही व केलेला खर्च वाया जातो त्यामुळे हा नियम बदलून ३५० फुटापर्यंत खोदाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे वाडा तालुका अध्यक्ष पांडुरंग पणरे यांनी दिली आहे.