लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या सांगलीतील स्मारकाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. यासाठी जिल्हा परिषदेला प्राप्त झालेले २ कोटी ८७ लाख रुपये वर्ग करून तातडीने निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी दिले. सांगलीतील महात्मा गांधी वसतिगृहाच्या आवारात आबांचे स्मारक होणार आहे. अद्याप या कामाची सुरुवात झाली नाही. जिल्हा परिषदेकडे यासाठी २ कोटी ८७ लाख रुपये आले आहेत. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी आ. जयंत पाटील, आ. सुमनताई पाटील, उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील यांनी स्मारकाच्या कामाचा आढावा घेतला. वसतिगृहात ज्या खोलीत आर. आर. आबांनी वास्तव्य केले, त्या खोलीबाहेर त्यांचा माहितीफलक लावण्याचा निर्णयही यापूर्वी झाला आहे. वसतिगृहाची इमारत सुधारण्यात आल्यानंतर आबांच्या खोलीबाहेर फलक लावण्यात येणार आहे.
आबांच्या स्मारकाचे काम बांधकाम विभाग करणार
By admin | Published: May 09, 2017 2:16 AM