शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत 'वाद' वाटप, चर्चा खोळंबली; राऊत-पटोले यांच्यात शाब्दिक वॉर, थेट दिल्ली दरबारी पोहोचली तक्रार!
2
मुंबईत ठाकरे गटच मोठा भाऊ; समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा देणार
3
आजचे राशीभविष्य - १९ ऑक्टोबर २०२४, कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील
4
पक्षबदलाची ऑक्टोबर हीट! भाजपचे राजन तेली, सुरेश बनकर, अजित पवार गटाचे दीपक आबा साळुंखे उद्धवसेनेत
5
छोट्या घटक पक्षांना हव्यात अधिक जागा; मविआ जागावाटपाचा विषय लांबला 
6
बालविवाह प्रथा संपुष्टात आणण्यास प्रत्येक जिल्ह्यात खास अधिकारी नेमा - सुप्रीम कोर्ट 
7
युद्धाचा भडका; सोन्याचा भाव ७७ हजार ९०० रुपयांवर, जीएसटीसह किती रुपये मोजावे लागणार? जाणून घ्या
8
सिद्दिकी हत्याकांड प्रकरण, पाच जणांना अटक
9
"लिस्ट द्या, मतदारांना आणण्यासाठी फोनपे, जे काय लागेल...", शिंदेंच्या आमदाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार
10
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात डोंबिवली कनेक्शन समोर; शुटर्सपर्यंत पोहचवले शस्त्र
11
CSMT कडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा घसरला; कल्याण रेल्वे स्थानकातील घटना
12
Womens T20 World Cup: यंदा नवा चॅम्पियन! West Indies आउट; New Zealand संघानं गाठली फायनल
13
पक्षात एंट्री अन् १२ दिवसांतच लॉट्री; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी!
14
MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत धुसफूस; २८ जागांचा नेमका वाद काय?
15
योजनादूतांसाठी महत्त्वाची बातमी: काम नाही अन् पगारही मिळणार नाही, कारण...
16
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे असतील, त्यांना..."; राऊतांवर बरसले, पटोले काय म्हणाले?
17
लेटर'बॉम्ब'नंतर शरद पवारांची भेट भोवली, आ. सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन
18
सलमान खानने खरेदी केली बुलेट प्रूफ कार, बिश्नोई टोळीच्या धमक्यांमुळे सुरक्षेत वाढ
19
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा खरा ठरणार?; मविआत वादाची ठिणगी, टोकाची भूमिका
20
महायुतीचं जागावाटप होणार फायनल? शिंदे, फडणवीस, पवारांची दिल्लीत शाहांसोबत बैठक

महावितरणचा घरगुती ग्राहकांना दिलासा

By admin | Published: March 18, 2015 1:51 AM

महावितरणने घरगुती ग्राहकांचे वीजदरात कपात केली आहे. ० ते १०० युनिट वीज वापरत असलेल्या ग्राहकांसाठी प्रति युनिट दर ४.१६ हून ३.६५ इतका कमी करण्यात आला आहे.

मुंबई: महावितरणने घरगुती ग्राहकांचे वीजदरात कपात केली आहे. ० ते १०० युनिट वीज वापरत असलेल्या ग्राहकांसाठी प्रति युनिट दर ४.१६ हून ३.६५ इतका कमी करण्यात आला आहे. एप्रिलमध्ये हा दर आणखी कमी होऊन प्रति युनिट ३.३६ होणार आहे. तर १०१ ते ३०० युनिट वीज वापर करत असलेल्यांसाठी हा दर प्रति युनिट ७.३९ हून ६.५४ आणि एप्रिलमध्ये ६.०५ लागू असा होणार असल्याचे महावितरणमधील सूत्रांनी सांगितले.डिसेंबर २०१४ पासून वीजदरवाढ लागू असलेल्या अनुदानाबाबत शासनाने निर्णय घेतला होता. तरीही कृषीपंपाच्या बाबतीत मात्र शासनाने वेगळी भूमिका घेत दरमहा ९२ कोटींचे अनुदान कायम ठेवले आहे. औद्योगिक ग्राहकांसाठीदेखील ३६५ कोटींचे अनुदान गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये देण्यात आले. त्यामुळे औद्योगिक ग्राहकांना देखील दिलासा मिळणार आहे. एक्सप्रेस फिडरवरील औद्योगिक ग्राहकांना फेब्रुवारीत प्रति युनिट असलेला ८.५९ हा दर मार्चमध्ये ७.५९ प्रति युनिट झाला. तो आता एप्रिलमध्ये आणखी कमी होत प्रति युनिट ७.०१ एवढा होणार आहे.नॉन एक्सप्रेस फिडरवरील औद्योगिक ग्राहकांकडून फेब्रुवारीतील प्रति युनिट ७.८२ ऐवजी मार्चमध्ये ६.८८ एवढा दर आकारला जाईल. तर एप्रिल महिन्यात ही आकारणी ६.३३ नुसार होणार आहे. वाणिज्यिक ग्राहकांना देखील मार्चमध्ये प्रति युनिट ९२ पैसे ते १.६३ पैसे एवढा दिलासा मिळणार आहे. एप्रिलमध्ये हा दर प्रति युनिट १.४५ ते २.५८ पैसे असा असेल. विद्युत नियामक आयोगाने मंजुरी देवून नवीन दर लागू होईपर्यंत हे बदल राहणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)