शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
5
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
6
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
7
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
8
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
9
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
10
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
11
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
12
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
13
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
14
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
15
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
16
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
17
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
18
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
19
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
20
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज

२३ टन अमली पदार्थ जप्त

By admin | Published: April 25, 2016 5:07 AM

‘एव्हॉन लाइफ सायन्सेस लिमिटेड’ या कंपनीतून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मदतीने सुमारे २३ टन अमली पदार्थांचा साठा हस्तगत केला

ठाणे : सोलापूरच्या ‘एव्हॉन लाइफ सायन्सेस लिमिटेड’ या कंपनीतून आतापर्यंत ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मदतीने सुमारे २३ टन अमली पदार्थांचा साठा हस्तगत केला आहे. कंपनीचा सल्लागार पुनीतच्या इशाऱ्यावरूनच ‘इफेड्रीन’ची तस्करी राजरोसपणे सुरू होती, अशी माहिती तपासात उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.चिंचोली एमआयडीसीतील या कंपनीत सुमारे १३० कामगार आहेत. त्या सर्वांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू असून त्यातील ४० कामगारांच्या जबाबातून बरीच माहिती हाती आल्याचे सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके यांनी सांगितले. उर्वरित ९० कामगारांचीही चौकशी केली जाणार आहे. या कंपनीचा सल्लागार पुनीत श्रीगी (रा. विरार, जिल्हा पालघर) याच्याच इशाऱ्यावरून कंपनीतील माल बाहेर काढला जात होता. आलेला माल एका कारमधून वितरीत करण्यात येत होता. कंपनीतील हा अमली पदार्थांचा व्यवहार उघड होऊ नये, म्हणून पुनीतने तिथले सर्व सीसीटीव्ही बंद केले होते. ठाण्यात सागर पोवळे आणि मयूर सुगदरे या दोघांना पकडल्यानंतर या कंपनीतून सुमारे साडेअठरा टन इफेड्रीनचा साठा ठाणे पोलिसांनी हस्तगत केला. त्याचवेळी सोलापुरातून स्वामी धानेश्वर आणि राजेंद्र डिमरी अशा चौघांना अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ त्याच कंपनीतील दुसऱ्या धाडीत दोन टन इफेड्रीन तसेच अडीच हजार लीटर अ‍ॅसिटीक अ‍ॅनहायड्रीक लिक्वीड असा सुमारे २३ टन अमली पदार्थांचा साठा पोलिसांनी हस्तगत केला. (प्रतिनिधी)>अ‍ॅसिटिक अनहायड्रीकपासून ब्राउन शुगर या कंपनीत दोन टन ६०० लीटर अ‍ॅसिटिक अनहायड्रीक जप्त करण्यात आले आहे. याच लिक्वीडपासून सुंडो इफेड्रीन तयार करून ती पावडर अफूच्या पावडरमध्ये मिसळून त्यापासून ब्राउन शुगर, गर्द आणि हेरॉइन या अमली पदार्थांची निर्मिती केली जात होती.>धाडसत्र सुरूच...या कंपनीत गेल्या एक आठवड्यापासून सुरू असलेले धाडसत्र अद्यापही सुरूच आहे. कंपनीच्या वेगवेगळ्या विभागांची कसून तपासणी केली जात आहे. पुणे, मुंबई आणि सोलापूर येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मदतीने ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने धाडसत्र सुरूच ठेवले आहे.>मालकही चौकशीच्या फेऱ्यातया कंपनीचे मालक अजित कामत, राजेंद्र कैमल आणि मनोज जैन या तिघांचीही अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम शेळके यांनी चौकशी केली. या तिघांनीही या प्रकरणातून हात झटकले असून आपण कसे निर्दोष आहोत, असा पवित्रा घेतला आहे. अर्थात, त्यांची कसून चौकशी केली जाणार असून, या प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढली जाणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली.