'राहुल नार्वेकरांकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान'; निर्णयांविरोधात ठाकरे गटाची याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 05:23 PM2024-01-15T17:23:38+5:302024-01-15T17:24:30+5:30

शिंदे गटाच्या शिवसेनेच्या भरत गोगावलेंची प्रतोदपदी नियुक्ती वैध ठरविली होती. जी नार्वेकरांकडे याचिकांची सुनावणी व निर्णय सोपविताना सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरविली होती. यावरून ठाकरे गटाने याचिका दाखल केली आहे. 

Contempt of Supreme Court by Rahul Narvekar; Petition by Uddhav Thackeray group against the decisions shivsena Eknath Shinde Mla Disqulification | 'राहुल नार्वेकरांकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान'; निर्णयांविरोधात ठाकरे गटाची याचिका

'राहुल नार्वेकरांकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान'; निर्णयांविरोधात ठाकरे गटाची याचिका

गेल्या काही महिन्यांपासून आमदार अपात्रता आणि शिवसेना कोणाची यावरून राज्यात सुरु असलेल्या प्रश्नावर काही दिवसांपूर्वीच विधानसभा अध्यक्षांनी निकाल जाहीर केला होता. यावेळी राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंचाच असल्याचा निर्णय देत आमदारांच्या अपात्रतेवरील याचिकांवरही निकाल दिला होता. या निकालांविरोधात आता उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 

विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयानेच ठाकरे गटाचा प्रतोद, व्हीप अधिकृत असल्याचे म्हटले होते, त्याविरोधात जात नार्वेकरांनी निकाल दिला आहे. यावरून ठाकरेंनी दोन्ही निकालांना आव्हान देणारी याचिका आज दुपारी दोन वाजता दाखल केली आहे. 

उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी ही याचिका ऑनलाईन दाखल केली असून आज सायंकाळी किंवा उद्या अंतिम याचिका दाखल करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालय यावर काय निर्णय देते याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेची २०१८ ची घटना विचारात घेता येणार नसल्याचे म्हटले होते. यामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्ष प्रमुख पदासह अनेक गोष्टी १९९९ च्या बाळासाहेब ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या घटनेनुसार ग्राह्य नसल्याचे म्हटले होते. तसेच शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंचाच असल्याचा निकाल दिला होता. शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरविता येणार नाही असेही म्हटले होते. तसेच ठाकरे गटाच्या आमदारांनाही अपात्र न करण्याचा निर्णय नार्वेकरांनी घेतला होता. तसेच शिंदे गटाच्या शिवसेनेच्या भरत गोगावलेंची प्रतोदपदी नियुक्ती वैध ठरविली होती. जी नार्वेकरांकडे याचिकांची सुनावणी व निर्णय सोपविताना सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरविली होती. यावरून ठाकरे गटाने याचिका दाखल केली आहे. 
 

Web Title: Contempt of Supreme Court by Rahul Narvekar; Petition by Uddhav Thackeray group against the decisions shivsena Eknath Shinde Mla Disqulification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.