शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

देशव्यापी संप सुरू, बळीराजा पुन्हा रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 06:34 IST

राज्यातील शेतकरी संपानंतर आता देशातील बळीराजा शुक्रवारपासून आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला आहे.

मुंबई : राज्यातील शेतकरी संपानंतर आता देशातील बळीराजा शुक्रवारपासून आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत शहरांची रसद थांबवण्याचा एल्गार शेतकरी संघटनांनी केला आहे. देशातील शेतकऱ्यांनी आज रस्त्यावर शहरांची रसद प्रत्यक्ष थांबवली. त्यामुळे त्याचा परिणाम भाजीपाला पुरवठ्यावर झाला.देशातील ११० शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन या देशव्यापी संपाची हाक दिली होती. सरसकट कर्जमाफी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी या मागण्यांसाठी देशव्यापी संप सुरू झाला असून, महाराष्ट्रातही ठिकठिकाणी दूध रस्त्यावर ओतून, भाजीपाला फेकून शेतकºयांनी रोष व्यक्त केला.नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात भाकड जनावरे सोडण्यात आली. जळगाव जिल्ह्यात भाजीपाल्यांचे लिलाव बंद पाडण्यात आले. किसान सभेने नगर जिल्ह्यातील अकोले तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. बुलेट ट्रेन आणून शेतकरी उद्ध्वस्त करण्याचा डाव शेतकरी उधळून लावतील, असा इशारा किसान सभेचे अध्यक्ष डॉ.अशोक ढवळे यांनी दिला.बीड जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातील खलंग्री येथील शेतकºयांनी सकाळीच संप सुरू केला. त्यांनी रेणापूर पिंपळफाटा येथे रास्ता रोको केला़ यावेळी उपसरपंच गजानन बोळंगे यांनी सरणावर बसून आत्मदहनाचा प्रयत्न केला़ पोलिसांनी पेट्रोलच्या बाटलीसह त्यांना ताब्यात घेतले़ जळगावातील चोपडा बाजार समितीत कडकडीत बंद पाळण्यात आला.नगरमध्ये जोर, अकोले तहसीलवर मोर्चाअहमदनगरमध्ये शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भाकड जनावरे नेत आंदोलन केले. दूधदरवाढ करा नाहीतर जनावरांची व्यवस्था सरकारने करावी, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. अकोले तहसीलवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकºयांनी तहसीलदारांच्या दालनासमोर जमिनीवर दूध ओतून निषेध नोंदविला.गोदाकाठी ४२ गावात दूध संकलन ठप्पनाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सिन्नर-शिर्डी महार्गावर सायखेडा चौफुली येथे रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी पोलिसांनी तीन आंदोलन कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतले. गोदाकाठ भागातील ४२ गावात शेतकºयांनी बंद पाळला असून दूध संकलन केंद्रे बंद होती. खामखेड्यात शेतकºयांनी रस्त्यावर टॉमेटो व कांदे फेकून संपाला पाठिंबा दिला.कुठे झालाकाय परिणाम?राजस्थान । शेतकºयांच्या संपामुळे राज्याच्या दक्षिण भागातील श्रीगंगानगर, हनुमानगढ, झुनझुनू या जिल्ह्यांतील भाज्या व दुधाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला. बिकानेर, नागौर, सिकर जिल्ह्यांनाही शेतकरी संपाची झळ बसली. मात्र दैनंदिन जीवनावर परिणाम झालेला नाही.उत्तर प्रदेश । येथील संभल जिल्ह्यात भाज्या, दूध व अन्य वस्तूंचा पुरवठा तेथील शेतकºयांनी पूर्णपणे थांबविला आहे. लखनौ व त्याच्या जवळील जिल्ह्यांतील फारच कमी शेतकरी या संपात सहभागी झाले.पंजाब व हरयाणा । अनेक शहरांना फळे, भाज्या, दूधाचा पुरवठा शेतकºयांनी बंद केला. या संपात सहभागी होण्यासाठी शेतकºयांवर दबाव आणलेला नाही, असे भारतीय किसान युनियनने म्हटले आहे.मध्य प्रदेश । या राज्यात शेतकरी संपामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम झाला नसला, तरी भाज्या,दूध व अन्य वस्तुंचा पुरवठा रोखल्याने येत्या काही दिवसांत विविध ठिकाणी त्यांची टंचाई जाणवू लागेल. हा संप देशातील २२ राज्यांत सुरु असल्याचा दावा राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाने केला असला तरी तसे चित्र दिसलेले नाही.जम्मू-काश्मीर, कर्नाटकमध्ये या संपाचा विशेष परिणाम जाणवला नाही.