नागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सोशल मीडियावर जाणूनबुजून ट्रोल करण्यात येत असून यासाठी एखादी टोळी किंवा कंपनीलाच कंत्राट देण्यात आले आहे, असा आरोप नागपुरातील भाजप आमदारांनी केला आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची भेट घेऊन तक्रार करण्यात आली.
मुंबईतदेखील अशा आशयाची तक्रार झाली आहे. फडणवीस हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे शासनाच्या त्रुटी समोर आणणे हे त्यांचे कर्तव्यच आहे. शिवाय राज्यपालांची भेट घेण्याचा त्यांना अधिकार आहे; मात्र त्यांनी कुठलेही वक्तव्य केले, भूमिका मांडली की त्यांना धमक्या देण्याचे प्रयत्न होत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत अयोग्य भाषेचा वापर होत आहे, असे निवेदनात म्हटले आहे. भाजपच्या शिष्टमंडळात आ. कृ ष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. मोहन मते, आ. गिरीश व्यास आदी उपस्थित होते.