शहरं
Join us  
Trending Stories
1
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
2
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
3
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
4
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
5
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
6
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
7
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
8
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
9
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
10
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
11
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
12
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
13
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
14
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
15
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
17
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
18
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
19
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
20
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...

ठेकेदारांची मनमानी, नगरसेवकांची खाबूगिरी

By admin | Published: July 15, 2017 2:59 AM

डहाणू नगरपरिषद प्रशासनाच्या सुस्त व उदासीन कारभारामुळे डहाणू शहरात कोटयावधींची विकासकामे अर्धवट स्थितीत आहेत

शौकत शेख । लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू : डहाणू नगरपरिषद प्रशासनाच्या सुस्त व उदासीन कारभारामुळे डहाणू शहरात कोटयावधींची विकासकामे अर्धवट स्थितीत आहेत. शासनाच्या विविध योजनेतून मंजूर झालेली विकासकामे नगरपरिषदेच्या आशिर्वादाने ठेकेदार आपल्या सोयीनुसार करीत असल्याने पुरती गैरसोय झाली आहे. त्यातच या विरोधात नगरसेवक ब्र सुद्धा काढत नसल्याने त्यांच्यात साटेलोट आहे की, काय अशी परिस्थिती आहे. चौकशीच्या विळख्यात अडकलेल्या डहाणू नगरपरिषदेची लोकसंख्या ६० हजार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने मिनीगोवा भासणाऱ्या या गावात पर्यटन विकासा अंतर्गत तलाव, रस्ते, पथदिवे, सुशोभिकरणाचे काम सुरु करण्यात आले होते. त्यावर आतापर्यंत चाळीस लाख रुपयां पेक्षा अधिक खर्च करण्यात झाला आहे. परंतु, गेल्या दीड, दोन वर्षापासून निधी उपलब्ध असतांनाही काम बंद आहेत. येथील प्रभूपाडा, आगार येथे स्मशानभुमीचे काम अद्याप सुरु करण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे डहाणूतील रस्त्यांवर बसणाऱ्या मासळी विक्रेत्या महिलांसाठी नॅशलन फिशरीस डेव्हलपमेंट बोर्ड, हैद्राबाद यांच्या कडून महाराष्ट्र राज्य मत्स्य उद्योग महामंडळ यांच्या मार्फत डहाणू लोणीपाडा येथे अद्ययावत वातानुकुलीत मासळीमार्केट बांधण्यात आले आहे. परंतु गेल्या दोन वर्षापासून ते अपूर्ण असल्याने ते जूगरी तसेच दारुपिणाऱ्याचा अड्डा बनले आहे. डहाणू शहरातील लोकांना पूरेसे पाणी मिळावे म्हणून शासनाने चाळीस कोटी रूपयांची सुजल निर्मल पाणी पूरवठा योजना मंजूर दिली. परंतु मुदतवाढ देऊनही पूरेशा प्रमाणात काम झालेले नाही. पालिका प्रशासन याबाबतीत ठोस निर्णय घेत नसल्याने ही योजना बारगळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, शहरासाठी शासनाने स्वतंत्र अग्निशमन दलासाठी लाखोचा निधी दिला आहे. त्यासाठी फायर ब्रिगेडचे वाहन असले तरी ते ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग, कार्यालय व सोयी-सुविधांची अद्याप कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. तसेच वारंवार सुचना देऊनही घराघरातून निघणारा घनकचऱ्यासाठी डहाणू पालिकेकडे डंपिंग ग्राऊंड नसल्याने सध्या मिळेल त्या जागेवर कचरा टाकला जात आहे. विशेष म्हणजे डहाणू नगरपरिषद प्रशासनाच्या नियोजनशुन्य कारभारामुळे वर्षभरात ओव्हर बजेट कामे केली जात असल्याने पालिकेच्या तिजोरीवर त्याचा भार पडत आहे. परिणामी वार्षिक काम करणाऱ्या ठेकेदारांना त्यांच्या बिलांसाठी सहा, सहा महिने वाट पहावी लागते. तर पालिकेची आर्थिक परिस्थिती दयनिय असतांना देखील पालिकेने वर्षभरापूर्वी डहाणू स्टेशन जवळचे स्वत:चे कार्यालय सोडून दरमहा ७५ हजार भाडे असलेल्या इमारतीत कार्यालय स्थलांतर केल्याने ही दिवाळखोरी कुणासाठी आणि का असा प्रश्न उपस्थित होत आहे.‘अपयशाचे सव्वा वर्ष’ तलाव, रस्ते, पथदिवे, सुशोभिकरणाचे कामावर अद्याप चाळीस लाखांपेक्षा जास्त निधी खर्ची पडला आहे. पाणी योजनेचे बारा वाजले असून डंपिंग ग्राऊंड नसल्याने शहराची कचरा कुंडी बनली आहे.मात्र, मुख्याधिकारी विनोड डवले म्हणतात की, मी येऊन फक्त सव्वा वर्ष झाला आहे. तसेच मी पदभार स्विकारल्यापासून अनेक विकासकामे सुरु असल्याचेही ते सांगतात. आता मात्र शहराच्या बकाल अवस्थेला कुणाची कारकीर्द जबाबदार आहे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.