- गौरीशंकर घाळेमुंबई - राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना, दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देणारी नाम फाउंडेशन आता सामुदायिक विवाह सोहळ्यांसाठीही पुढाकार घेत आहे. मराठवाडा आणि विदर्भ या दुष्काळग्रस्त भागात प्रत्येक जिल्ह्याला सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी प्रत्येकी एक लाखाचा निधी देण्याचा निर्णय नाम फाउंडेशनने घेतला आहे.आर्थिकदृष्टया हालाखीच्या परिस्थितीमुळे विवाहाची चिंता असणारा मोठा वर्ग आहे. पैशाअभावी शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील मुलामलींची लग्ने राहिल्याची अनेक उदाहरणे आहेत. विशेषत: मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात लग्नाच्या ओझ्यापायी मुलींनी आत्महत्या केल्याच्या घटनाही अनेकदा समोर आल्या आहेत. सामुदायिक विवाह सोहळ्यांच्या माध्यमातून या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न राज्य धर्मादाय आयुक्तालयाने सुरू केला आहे. धार्मिंक संस्था, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जिल्हानिहाय समित्याही स्थापन करण्यात आल्या आहेत. या उपक्रमात नाम फाउंडेशनही सहभागी होईल. पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक लाखाचा निधी दिला जाईल. आवश्यकता भासल्यास राज्यभरातील समित्यांबाबत असा निर्णय घेण्याचीही तयारी ‘नाम’ने दर्शविली आहे.आयोजनासाठी समित्यांची स्थापनाधार्मिक, शैक्षणिंक संस्थांच्या सहयोगाने सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यासाठी राज्यभर जिल्हनिहाय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. आतापर्यंत नगर, दौंड, सोलापूर, शिर्डी, ठाणे आदी ठिकाणी या समित्यांच्या माध्यमातून सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. १५ मेपर्यंत अन्य समित्यांच्या माध्यमातूनही अशा प्रकारचे सोहळे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिली. धार्मिक संस्थांकडे मोठ्या प्रमाणावर निधी जमा होतो. यातील काही निधी समाजातील वंचित घटकांसाठी वापरला जावा या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही डिगे यांनी सांगितले.फुलांची अक्षता : विशेष बाब म्हणजे अन्नधान्याची नासाडी टाळावी, यासाठी सामुदायिक विवाह सोहळ्याप्रसंगी फक्त व्यासपीठावर, जोडप्यांजवळ असणा-या व-हाडींनाचअक्षता दिल्या जाणार आहेत. स्टेजपासून लांब असणा-यांना अक्षता म्हणून फुले देण्याचानिर्णय समित्यांनी घेतला आहे. त्यामुळे विवाहसोहळ्यातील अन्नधान्याची नासाडीही थांबणार आहे.
राज्यातील सामुदायिक विवाह सोहळ्यांना ‘नाम’चा हातभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 4:58 AM