मुंबई : महिला व बालविकास आयुक्तालयातील वादग्रस्त उपायुक्त राहुल मोरे यांची अखेर पुण्यातून उचलबांगडी करून त्यांची अंबरनाथ येथील बालविकास प्रकल्प अधिकारी या पदावर रवानगी करण्यात आली असून, नूतन बालविकास उपायुक्त म्हणून बी. एल. मुंडे यांनी पदभार स्वीकारला. वर्षानुवर्षे पुण्यात ठाण मांडून बालगृह चालकामध्ये भेदभाव करीत अनाथ बालकांच्या भोजन अनुदान वाटपात दुजाभाव करून अनागोंदी करणाऱ्या राहुल मोरे यांच्या विरोधात बालविकास संस्थाचालक व कर्मचारी संघटनेने केलेल्या आंदोलनाची दखल घेत महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतली आणि मोरे यांना मूळ पदावर पाठवून विभागातील वरिष्ठ अधिकारी असलेल्या बी.एल. मुंडे यांना उपायुक्त (बालविकास) या नियमित पदावर नियुक्त केले. नवीन उपायुक्त मुंडेंचे महाराष्ट्र बालविकास संस्थाचालक व कर्मचारी संघटनेने स्वागत करून त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी मुंडे यांनी संघटनेला सोबत घेऊन, त्यांची मते जाणून घेऊन राज्यातील बालगृहांची प्रतिमा उंचवण्याचा आणि समस्या सोडविण्यास आपले प्राधान्य असेल, असे त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. (प्रतिनिधी)
वादग्रस्त उपायुक्त मोरे यांची उचलबांगडी !
By admin | Published: June 15, 2015 2:41 AM