मुंबई :केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेल्या नागरिकत्व कायद्यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर टीका करण्याची कोणतेही संधी सोडत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता नागरिकत्व कायद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांची जीभ घसरली असून, त्यांनी वादग्रस्त टीका केली आहे.
राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) या कायद्यामुळे केवळ मुस्लिम नागरिकांनाच नाही, तर हिंदू नागरिकांनादेखील नागरिकत्व सिद्ध करणे जड जाईल. त्यामुळे एनआरसी कायदा राज्यात लागू होऊ देणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे. उद्धव ठाकरे यांना उत्तर देताना शेलार यांनी वादग्रस्त विधान केले आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वसई जनता सहकारी बँकेचे माजी संचालक सुरेश जोशी यांच्या स्मृत्तीदिनानिमित्त नालासोपाऱ्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना शेलार म्हणाले की, “शिवसेना सध्या एवढे रंग बदलत आहे की रंग बदलणारा सरडाही आत्महत्या करेल. तर CAA हा कायदा केंद्राचा आहे. त्यामुळे महाराष्ट्रा हा कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे अरे तुझ्या बापाचे राज्य आहे का?”, अशी वादग्रस्त टीका शेलारांनी यावेळी केली.
नागरिकत्व कायद्याच्या मुद्यावरून राज्यातील सत्तेत असलेले काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेना विरोधात भाजप नेत्यांचे युध्द रंगले आहे. तर राज्यात सुरु असलेल्या नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलनात तीनही सत्ताधारी पक्षातील नेते सहभाग घेत आहे. तर दुसरीकडे भाजपकडून याच नागरिकत्व कायद्याच्या समर्थनात मोर्चे काढले जात आहे.
मागल्या दाराने नव्हे, छप्पर फाडूनच आलोय; उद्धव ठाकरेंचे विरोधकांना प्रत्युत्तर
..अन् उद्धव ठाकरे कात्रीत सापडले; सांगितला युतीत ओढवलेला प्रसंग
म्हणे CAA लागू होऊ देणार नाही, अरे तुझ्या बापाचे राज्य आहे का? ; शेलारांची वादग्रस्त टीका'...तर असं हिंदुत्व स्वीकारायला तयार नाही'; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल...तर मी मुख्यमंत्री झालोच नसतो, उद्धव ठाकरेंचे विधान