मालेगाव - सीएएविरोधात देशाची राजधानी दिल्ली गेल्या आठवडाभरापासून पेटली आहे. यामध्ये सीएए समर्थक आणि विरोधक आमनेसामने आल्याने तणाव निर्माण झाला. त्याचे पडसाद दगडफेक, जाळपोळ यामध्ये उमटले, मात्र या हिंसक आंदोलनाला धार्मिक रंग देण्याचं काम काही जणांनी सुरु केलं.
सध्या अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील मालेगाव येथील एमआयएमचे आमदार मोहम्मद इस्माइल यांचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल होत आहे. वारिस पठाण यांच्या विधानानंतर मोहम्मद इस्माइल यांनी केलेल्या विधानाचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या व्हिडीओत मोहम्मद इस्माइल म्हणतात की, शहरात गोळीबार झाला तरी गुन्हा दाखल का केला जात नाही? शहरातील लोकं मूर्ख आहेत असं समजता का? असा सवाल त्यांनी पोलीस विभागाला विचारला आहे.
तसेच शहरात काय परिस्थिती आहे याची आम्हाला कल्पना आहे, शहरात शांतता राहावी यासाठी आम्ही पुढाकार घेतो, शहरावर संकट येतं तेव्हा आम्ही पोलिसांच्या आधी पोहचतो, लोकांना शांत करतो, आम्ही शांतता ठेवतो तसेच जर आमच्या अंगावर कोणी येत असेल शांतात भंग करणं हेदेखील आम्हाला येतं. आम्ही हातात बांगड्या भरल्या नाहीत असा इशारा एमआयएमचे आमदार मोहम्मद इस्माइल यांनी दिला आहे. त्याचसोबत हा आमचा प्रामाणिकपणा आहे म्हणून शांत आहोत. २००९ च्या निवडणुकीत हरल्यानंतर लोकांना मारहाण करण्यात आली, कारखान्यांना आग लावली गेली. लोकांकडून पैसे लुटले, २०१९ च्या निवडणुकीनंतरही असाच प्रकार सुरु आहे, शहरात गुंडगिरी वाढली आहे असं म्हटलं आहे.
मोहम्मद इस्माइल यांनी दिलं स्पष्टीकरणया व्हिडीओवर स्पष्टीकरण देताना मोहम्मद इस्माइल यांनी सांगितले की, मी केलेले वक्तव्य महाराष्ट्राशी अथवा देशाशी निगडीत नाही तर शहरासंदर्भात आहे. गोळीबारीची घटना आमच्या समर्थकांच्या घराजवळ करण्यात आली. याबाबत मी शांतता राखण्यासाठी पोलिसांची मदत करतो पण अशाप्रकाराने शांतता भंग होऊ शकते असं स्पष्टीकरण दिलं आहे.
यापूर्वी वारिस पठाण यांच्या विधानामुळे एमआयएम अडचणीत आली होती. वारिस पठाण यांनी १५ फेब्रुवारीला कर्नाटकातल्या गुलबर्गामध्ये भाषण केले होते. या सभेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'आपल्याला स्वातंत्र्य मिळवावे लागेल. जी गोष्ट मागून मिळत नसेल, ती हिसकावून घ्यावी लागेल. आता ती वेळ आलेली आहे. आम्ही माता, भगिनींना पुढे करतो, असे ते म्हणतात. आता तर फक्त सिंहिणी बाहेर पडल्या आहेत आणि तरीही तुम्हाला घाम फुटला आहे. आम्हीदेखील त्यांच्या सोबत बाहेर पडलो, तर काय होईल याचा विचार करा. आम्ही १५ कोटी आहोत. मात्र १०० कोटींवर भारी पडू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा,' असे वादग्रस्त विधान पठाण यांनी केले होते.
महत्त्वाच्या बातम्या
...तर अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा पोंक्षेंचं योगदान श्रेष्ठ; सचिन सावतांची खोचक टीका
शाह यांच्या टीकेला तृणमूलचे प्रत्युत्तर; दिल्ली सांभाळण्याचा गृहमंत्र्यांना दिला सल्ला
दिल्लीत पुन्हा एकदा दहशतीचं सावट; रविवारी रात्री 'त्या' दोन तासांत काय घडलं?
'आप अन् काँग्रेस'नेच दिल्लीच्या दंगली भडकावल्या, आठवलेंचा आरोप
पोलीस भरतीत ओबीसींवर अन्याय; PSI च्या ६५० जागांची जाहिरात रद्द करण्याची मागणी