लतादीदींच्या स्मारकावरून विसंवादी सूर, काँग्रेस-भाजपकडून शिवाजी पार्कात स्मृतिस्थळाची मागणी, सेनेचा केंद्राकडे अंगुलीनिर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 11:41 AM2022-02-08T11:41:39+5:302022-02-08T11:41:58+5:30

शिवाजी पार्क येथे लतादीदींचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी राम कदम यांनी केली आहे. यासंदर्भात कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविल्याचेही सांगितले आहे.

Controversial tone from Latadidi's memorial, Congress-BJP demand memorial in Shivaji Park, Sena points to Center | लतादीदींच्या स्मारकावरून विसंवादी सूर, काँग्रेस-भाजपकडून शिवाजी पार्कात स्मृतिस्थळाची मागणी, सेनेचा केंद्राकडे अंगुलीनिर्देश

लतादीदींच्या स्मारकावरून विसंवादी सूर, काँग्रेस-भाजपकडून शिवाजी पार्कात स्मृतिस्थळाची मागणी, सेनेचा केंद्राकडे अंगुलीनिर्देश

Next

मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर आता त्यांच्या स्मारकावरून विसंवादी सूर उमटू लागले आहेत. शिवाजी पार्क येथे लतादीदींचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी केली आहे, तर स्मारकाबाबत राजकारण करू नये, असे आवाहन करतानाच लतादीदींच्या स्मारकाबाबत केंद्र सरकारनेच विचार केला पाहिजे, असे म्हणत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्राला यात ओढण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसनेही शिवाजी पार्कातच स्मारक व्हायला हवे, असे सांगत भाजपच्या सुरात सूर मिसळला. 

शिवाजी पार्क येथे लतादीदींचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी राम कदम यांनी केली आहे. यासंदर्भात कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविल्याचेही सांगितले आहे. जिथे दीदींवर अंत्यसंस्कार झाले, त्या पंचतत्त्वात विलीन झाल्या, त्याच जागेवर स्मृतिस्थळ उभारायला हवे. तिथे जगाला प्रेरणा देईल, असे आंतराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हायला हवे, अशी करोडो देशवासीयांची भावना असल्याचेही ते म्हणाले. त्याचा सन्मान करून सरकारने तातडीने स्मारकाचे काम सुरू करावे, अशी मागणीही कदम यांनी केली. काँग्रेसनेही या मागणीला एका अर्थाने पाठिंबा दिला आहे. लतादीदी यांचे स्मारक हे शिवाजी पार्कमध्येच व्हायला हवे, तेसुद्धा आंतराष्ट्रीय दर्जाचे असायला हवे. देशातून व जगातून येणाऱ्या लोकांना लतादीदींच्या स्मारकाला भेट दिल्यानंतर त्यांचा गोड आवाज स्मरायला हवा. कालच्या, आजच्या व उद्याच्या पिढीला स्मरणात राहील, अशा दर्जाचे स्मारक शिवाजी पार्कमध्ये व्हावे, ही काँग्रेसची भूमिका असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले. 

देशाला विचार करावा लागेल - राऊत
शिवसेना नेते संजय राऊत यांनी हा विषय केंद्र सरकारकडे ढकलण्याचा प्रयत्न केला. लतादीदी या महान होत्या. आपल्या भूमीत त्यांनी जन्म घेतला, महाराष्ट्राशी त्यांचे नाते आहे. त्या शरीराने गेल्या. आत्मा आपल्याकडे आहे. त्या अमर राहतील. काही लोक त्यांच्या स्मारकाबाबत बोलत आहेत. त्यांचे स्मारक बनिवणे सोपे नाही. त्यासाठी केंद्र सरकारने विचार करायला हवा. दीदींच्या स्मारकाबाबत देशाला विचार करावा लागेल, असे राऊत म्हणाले.
 

Web Title: Controversial tone from Latadidi's memorial, Congress-BJP demand memorial in Shivaji Park, Sena points to Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.