शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

हरयाणा निकालानंतर मविआत भूकंप?; संजय राऊत- नाना पटोले यांच्यात शाब्दिक 'वॉर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 12:49 IST

हरयाणा निकालानंतर महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटत आहेत. महाविकास आघाडीत ठाकरे गट काँग्रेसविरोधात आक्रमक झाल्याचं दिसून येते. 

मुंबई - हरयाणा निवडणुकीच्या निकालानं राज्यातील महाविकास आघाडीत संघर्ष पेटल्याची चिन्हे दिसून येत आहेत. हरयाणात भाजपानं पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवली त्यातूनच उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून काँग्रेसवर कुरघोडी सुरू झाली आहे. मुख्यमंत्रि‍पदावरून ठाकरे गट आग्रही झाला आहे. हरयाणा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. हरियाणाचा पराभव हा दुर्दैवी आहे. इंडिया आघाडीचा विजय जम्मू काश्मीरमध्ये झाला. हरयाणात जर इंडिया आघाडी झाली असती, त्यात सपा, आप, एखादी जागा शिवसेना, राष्ट्रवादीला मिळाली असती तर त्याचा परिणाम निकालात झाला असता असं सांगत संजय राऊतांनी काँग्रेसला खडे बोल सुनावले आहेत.

पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, आम्ही एकतर्फी जिंकू असं काँग्रेसला वाटत आहे, जिथे काँग्रेस कमकुवत असते तिथे ती प्रादेशिक पक्षांची मदत घेते, हे भाजपाचेच धोरण आहे आणि जिथं काँग्रेसला वाटतं आपण मजबूत आहोत तिथे ते स्थानिक प्रादेशिक पक्षांना महत्त्व देत नाहीत. या सगळ्याचा परिणाम हरयाणासारख्या निकालात झाला. हरयाणासारख्या राज्यात भाजपा विजयी होईल असं सांगणारा कुणी एकही व्यक्ती अथवा पत्रकार भेटला नाही. हरयाणातील पराभव दुर्दैवी असला तरी त्यातून आम्हाला काही गोष्टी शिकाव्या लागतील. देशातील निवडणुका आम्हाला एकत्रितच लढाव्या लागतील. कुणी स्वत:ला मोठा भाऊ, छोटा भाऊ समजू नये. लोकसभेतील यश इंडिया आघाडीचे आहे असं त्यांनी सांगत काँग्रेसला अप्रत्यक्षपणे टोला लगावला. 

तसेच हरयाणाच्या निकालाचा कुठलाही परिणाम महाराष्ट्रात होणार नाही. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिघांची महाविकास आघाडी आहे. याठिकाणी उद्धव ठाकरे, शरद पवारांसारखे नेतृत्व जागरुक आहे. हरयाणाचा विजय फार मोठा देदीप्यमान विजय नाही. ठिकठिकाणी अपक्षांनी मते घेतली. आमच्या मतांचे विभाजन झाले. भाजपाने ते ठरवून केले. शेवटी जिंकतो त्याचे अभिनंदन, देशात लोकशाही आहे. काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे काही आक्षेप घेतलेत त्यावर आयोगाने निर्णय घेतला पाहिजे. परंतु जणुकाही देवेंद्र फडणवीस हरयाणात गेलेत, तिथे विजय मिळवून दिलाय असं नाही. ९० जागांची विधानसभा आहे, काही जातीपातीचं राजकारण असते तरीही काँग्रेसला ३६ जागा मिळाल्यात, बहुमताला ४५ लागतात, केवळ ९ जागा कमी पडल्यात. आम्ही निराश झालेलो नाही. काँग्रेस पक्षाला भूमिका घ्यावी लागेल. जर काँग्रेसला स्वबळावर लढायचं असेल तर तशी त्यांनी भूमिका घेतली पाहिजे मग इतर पक्ष आपापल्या राज्यात त्यांची भूमिका घेतील असा इशाराही संजय राऊतांनी दिला आहे.

दरम्यान, संजय राऊत काय बोलतात, काय लिहितात त्यावर आम्ही लक्ष देत नाही. हरियाणा आणि महाराष्ट्र हा फरक ज्यांना कळत नसेल तर हा त्यांचा विषय आहे. मी संजय राऊतांवर जास्त प्रतिक्रिया देत नाही. वेळ आल्यावर प्रतिक्रिया देईन. जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं समजून चालायचं. आजच्या बैठकीत राऊतांशी बोलू, अग्रलेख वस्तूस्थितीला धरून होता की मुद्दामून लिहिला ते विचारू. आपण जे समन्वयाने महाराष्ट्रात काम करतोय त्यातून चांगला संकेत जावा हा राऊतांना सल्ला आहे. सुरुवातीपासून महाराष्ट्रात मेरिटप्रमाणेच जागावाटप व्हावं अशी आमची भूमिका आहे. त्यानुसारच काम सुरू आहे. ठाकरे-पवार नेतृत्व जागरूक आहे हे संजय राऊतांना का बोलावं वाटतं हा प्रश्न आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी राऊतांच्या विधानावर दिली आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNana Patoleनाना पटोलेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीharyana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४