मुंबई – विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या जागेवर लवकरात लवकर नियुक्ती करावी अशी मागणी वारंवार महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. ६ नोव्हेंबर २०२० रोजी मविआ सरकारनं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना १२ जणांच्या यादीचं पत्र पाठवलं होते. मात्र याबाबत अद्यापही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या नावांची घोषणा केली नाही. त्यामुळे राज्यपालविरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा वाद समोर आला होता.
आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं होतं. राज्यपालांकडून या पत्रात ६ नावांचा उल्लेख केला आहे. २९ सप्टेंबर २०२० रोजी हे पत्र राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं होतं. ६ नावांचा उल्लेख करत राज्यपालांनी या नावांची शिफारस राज्य मंत्रिमंडळात करावी आणि तो ठराव राजभवनाकडे पाठवावा असं म्हटलं होते. हे पत्र टीव्ही ९नं समोर आणलं.
महाविकास आघाडीचे नेते १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी वेळोवेळी राज्यपालांना भेटत आहेत. मात्र अद्याप मंत्रिमंडळाने पाठवलेल्या नावाला राज्यपालांनी मंजुरी दिली नाही. मात्र आता २०२० मधील हे पत्र माध्यमांसमोर आलं आहे. परंतु महाविकास आघाडीने मंत्रिमंडळात ठराव करून इतर १२ नावे राज्यपालांना पाठवली होती. मात्र राज्यपालांनी या नावांची घोषणा केली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ अनेकदा राजभवनात जाऊन १२ आमदारांची नियुक्ती करावी अशी विनंती केली होती. आता हे पत्र समोर आल्यानं नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. मात्र माध्यमांमध्ये आलेले हे पत्र बनावट असल्याचं राजभवनानं सांगितलं आहे.
‘ही’ आहेत ६ नावं
वीरभद्रेश करबसप्पा बसवंती(सामाजिक)
रमेश कोकाटे (राजकीय)
सतीश घरत (उद्योग)
संतोष नाथ(सामाजिक)
जगन्नाथ शिवाजी पाटील(सामजिक)
मोरेश भोंडवे(राजकीय)
महाविकास आघाडीने दिलेली नावं
काँग्रेस – सचिन सावंत(सहकार आणि समाजसेवा), मुझफ्फर हुसैन(समाजसेवा), रजनी पाटील, अनिरुद्ध वणकर
राष्ट्रवादी काँग्रेस – एकनाथ खडसे(सहकार आणि समाजसेवा), राजू शेट्टी(सहकार आणि समाजसेवा), प्रा. यशपाल भिंगे (साहित्यिक) आनंद शिंदे(कला)
शिवसेना - उर्मिला मातोंडकर(कला), नितीन बानगुडे-पाटील(साहित्यिक), विजय करंजकर आणि चंद्रकांत रघुवंशी