पुणे : आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अशा लेखनशैलीतून अवघ्या तरुणाईला भुरळ जो भुरळ घालतो.. ज्याच्या पुस्तकावर हमखास चित्रपट बनतो... तो स्वत: एक स्टाईल आयकॉन आहे... असा आघाडीचा व नव्या पिढीचा लेखक म्हणजे चेतन भगत. त्याच्याशी मनमोकळा आणि दिलखुलास संवाद साधण्याची संधी पुणेकरांना आणि पुण्यातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. साईबालाजी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्स आणि लोकमत नॉलेज फोरम यांच्या माध्यमातून प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांच्याशी संवाद साधण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिनांक ६ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता हॉटेल वेस्टीन येथे होणार आहे. 'हाऊ टू बी अ सुपर अॅचिव्हर' हा त्यांच्या संवादाचा प्रमुख विषय असणार आहे. पुण्यातील नामांकीत महाविद्यालयांतील विद्यार्थी आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे पुण्यातील प्रतिथयश व मान्यवर व्यक्तींचाही सहभाग या कार्यक्रमास असणार आहे. चेतन भगत हे विशेषत: तरुण मुलांमध्ये लेखक म्हणून अतिशय लोकप्रिय आहेत. सध्याचे आघाडीचे बेस्टसेलर लेखक म्हणून त्यांचे नाव देशविदेशात सन्मानाने घेतले जाते. भारतीय लेखक, स्तंभलेखक, प्रेरणादायी वक्ते म्हणून सुपरिचित आहेत. फाईव्ह पॉईंट समवन, वन नाईट अॅट कॉलसेंटर, ३ मिस्टेक्स आॅफ माय लाईफ, मेकिंग इंडिया आॅसम ही त्यांची काही गाजलेली पुस्तके आहेत. त्यांच्या पुस्तकांवर बॉलीवूडमध्ये ३ इडियट्स, काय पो छे, टू स्टेट्स असे गाजलेले चित्रपटही बनलेले आहेत. विविध संस्था संमेलनांतून ते व्याख्यानेही देतात. विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना या निमित्ताने मनमोकळी उत्तरे चेतन भगत देणार आहेत. कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक पर्वणी ठरेल यात शंका नाही. कार्यक्रमाचे डिजीटल पार्टनर जिओ असून सिंहगड इन्स्टिट्यूट, सूर्यदत्ता, केंम्ब्रीज, चाटे संस्था हे अॅकेडेमिक पार्टनर आहेत. हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठीच आहे.
चेतन भगत साधणार विदयार्थ्यांशी संवाद
By admin | Published: October 05, 2016 12:55 AM