शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
2
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
3
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
4
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
5
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
6
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
7
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
9
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
10
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
11
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
13
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
14
"BCCI नाही, BJP सरकार...!"; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या भूमिकेवर शोएब अख्तरचं मोठं विधान
15
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
16
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
17
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
19
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?

सहपोलीस आयुक्तांची मुंबईला बदली

By admin | Published: July 09, 2016 12:49 AM

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात आज फेरबदल झाले असतानाच गृहविभागाने विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या चार अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्यात. नागपूरचे सहपोलीस आयुक्त

नागपूर : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात आज फेरबदल झाले असतानाच गृहविभागाने विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या चार अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्यात. नागपूरचे सहपोलीस आयुक्त राजवर्धन सिन्हा यांच्या नावाचाही बदलीच्या यादीत समावेश आहे. राजवर्धन आता विशेष पोलीस महानिरीक्षक (तुरुंग) म्हणून मुंबईला जबाबदारी सांभाळणार आहेत. अत्यंत हुशार, मितभाषी आणि सौजन्यशील अधिकारी म्हणून राजवर्धन ओळखले जातात. त्यांच्या जागी संतोष रस्तोगी हे आता नागपूरचे सहपोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. १९९८ च्या बॅचचे आयपीएस असलेले रस्तोगी केंद्रात प्रतिनियुक्तीवर (सीबीआय) गेले होते. ३० मे २०१६ ला ते आपला कार्यकाळ पूर्ण करून परत महाराष्ट्रात आले. तेव्हापासून ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. मध्यंतरी त्यांना नागपुरात ह्यआॅब्जर्व्हरह्ण म्हणून पाठविण्यात येणार असल्याचीही चर्चा होती. या चर्चेचा वेगवेगळा अर्थ लावला जात असतानाच रस्तोगी यांना आज नागपूरचे सहपोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली.--उपायुक्तांच्याही अंतर्गत बदल्यापोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनीही आज शहरातील पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करून अनेकांना धक्का दिला. नव्या फेरबदलानुसार परिमंडळ चारचे उपायुक्त ईशू सिंधू यांना विशेष शाखेची जबाबदारी सोपविण्यात आली. दोन आठवड्यांपूर्वी नागपुरात आलेले जी. श्रीधर यांना परिमंडळ चारचे उपायुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले तर, गुन्हेशाखेच्या आर्थिक विभागाचे (ईओडब्ल्यू) उपायुक्त म्हणून राकेश कलासागर यांची नियुक्ती करण्यात आली.