सोलापूर : राज्य सरकारचा ‘सहकार महर्षी’ पुरस्कार वर्धा कुक्कुटपालन व कृषी उद्योग संशोधन संस्थेला जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे त्याचे स्वरूप आहे. सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी केली. प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांमधून ‘सहकार भूषण’ पुरस्कार वसंत सर्व सेवा सहकारी सोसायटी म्हैसाळ, ता. मिरज, जि. सांगली (पुणे विभाग), निफाड विकास सोसायटी नाशिक(नाशिक विभाग), नेरापिंगळाई विकास सहकारी सोसायटी ता. मोर्शी, जि.अमरावती (अमरावती विभाग), सहकारनिष्ठ पुरस्कार अंधारी विकास सोसायटी सिल्लोड, औरंगाबाद (औरंगाबाद विभाग), लांजे पंचक्रोशी विकास संस्था लांजा, रत्नागिरी(कोकण विभाग), तळोली विकास सोसायटी नागभीड, चंद्रपूर (नागपूर विभाग) यांना जाहीर झाला आहे.नागरी पतसंस्था, ग्रामीण बिगरशेती संस्था व पगारदार नोकरांच्या संस्थांसाठीच्या ‘सहकारभूषण’ पुरस्कारासाठी ज्ञानदीप सहकारी पतसंस्था अरुणोदयनगर, मुलुंड-पूर्व, मुंबई (कोकण विभाग), धन्वंतरी नागरी पतसंस्था सातारा (पुणे विभाग), भाई उद्धवराव पाटील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शिक्षक पतसंस्था, उस्मानाबाद (औरंगाबाद विभाग), सहकारनिष्ठ पुरस्कार साईसेवा ग्रामीण बिगरशेती पतसंस्था काष्टी, श्रीगोंदा(नाशिक विभाग), प्रियदर्शनी नागरी पतसंस्था नांदुरा, जि.बुलडाणा (अमरावती विभाग), गिरनार अर्बन क्रेडिट सोसायटी नागपूर (नागपूर विभाग) यांची निवड झाली आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकांना दिला जाणारा ‘सहकार भूषण’ पुरस्कार पुणे विभागातील पुणे जिल्हा बँकेला, तर ‘सहकारनिष्ठ पुरस्कार’ औरंगाबाद विभागातून लातूर जिल्हा बँकेला, कोकण विभागातून रत्नागिरी जिल्हा बँकेला दिला जाणार आहे. (प्रतिनिधी)२६ एप्रिलला वितरणपुरस्कारांचे वितरण २६ एप्रिल रोजी राज्यपाल विद्यासागर राव, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते सोलापुरात होणार आहे. ‘सहकारभूषण’ पुरस्कार ५१ हजार रुपये, तर ‘सहकारनिष्ठ’ पुरस्कार २५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह असा आहे.राज्यभरातून १३३ संस्थांचे प्रस्ताव सहकार खात्याकडे आले होते. त्यातून निवड समितीने छाननी करून हे पुरस्कार जाहीर करण्यात आले.
वर्धा कुक्कुटपालन संस्थेला सहकार महर्षी पुरस्कार
By admin | Published: April 16, 2017 2:12 AM