मुंबई : राज्य शासनाने लसीकरणाच्या मोहिमेला दिलेल्या व्यापक स्वरूपामुळे लसीकरणात महाराष्ट्र हा देशभरात अग्रेसर असल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्राने राजस्थानलाही मागे टाकले आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख ४५ हजार ८६० लाभार्थ्यांचे कोरोना लसीकरण करण्यात आले. तर राजस्थानमध्ये ५५ लाख ८२ हजार ८७२ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. देशात महाराष्ट्र आणि राजस्थाननंतर गुजरात ५४ लाख ८२ हजार ५०, उत्तरप्रदेश ५३ लाख २८ हजार ४१९ आणि पश्चिम बंगालमध्ये ५० लाख ९१ हजार १०३ जणांनी कोरोनाची लस घेतली. देशात ३१ मार्चपर्यंत लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ५ कोटी ३९ लाख ८९ हजार ३५ इतकी आहे; तर दुसरा डोस घेणारे ९० लाख ६५ हजार ३१८ आहेत. आतापर्यंत एकूण ६ कोटी ३० लाख ५४ हजार ३५३ जणांनी कोरोना लस घेतल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली. राज्यात ३१ मार्च रोजी दिवसभरात २ लाख १६ हजार २११ जणांना लस देण्यात आली. त्यात १ लाख ९१ हजार ५७३ लाभार्थ्यांना कोविशिल्ड लस आणि २४,६३८ जणांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली. इथे सर्वांत कमी लसीकरण लक्षद्वीप ६ हजार ९५९दादरा नगर हवेली १३ हजार १९७दमण आणि दीव १४ हजार ३४अंदमान निकोबार २२ हजार ८८लडाख ४५ हजार ८१२ चंदीगढ ७५ हजार ९५३अरुणाचल प्रदेश ८५ हजार ९९८
corona vaccination : महाराष्ट्र देशात लसीकरणात अव्वल, राजस्थानला टाकले मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 5:55 AM