लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना लसीसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले जात असले तरी आवश्यकतेएवढा पुरवठा होत नसल्याने या मोहिमेला खीळ बसत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये लसीकरण केंद्र बंद आहेत, तर अनेक ठिकाणी लसीकरण विस्कळीत झाले आहे. पुणे महापालिकेला गुरूवारी केवळ दहा हजार डोस प्राप्त झाल्याने, शहरातील १७२ लसीकरण केंद्रांना मागणीप्रमाणे लस पुरविणे शक्य झाले नाही. शहरातील ८३ लसीकरण केंद्र दुपारी बारा वाजल्यापासून बंद करण्यात आली. पिंपरी चिंचवडमध्येही लस संपल्याने लसीकरण ठप्प झाले असल्याचे चित्र दिसून आले.
साठा संपल्याने लसीकरण बंदऔरंगाबाद : शुक्रवारी सकाळी काही केंद्रांवरील शिल्लक लस नागरिकांना देण्यात आली. मात्र दुपारी बारा वाजेनंतर शहरातील सर्व लसीकरण केंद्र बंद करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढवली.
आता तीन दिवसच पुरेलनांदेड : शुक्रवारी महापालिकेकडे अवघे चार हजार डोसेस उपलब्ध होते. हा साठा केवळ तीन दिवस पुरेल एवढाच असल्याने लसीकरणाची मोहिम ठप्प होण्याची भीती आहे.
प्रशासन प्रतीक्षेतच परभणी : जिल्ह्यात गुरुवारी रात्री ५ हजार लस जिल्ह्यात शिल्लक होत्या. शुक्रवारी दिवसभर लसीकरणानंतर साठा संपला. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात एकही डोस उपलब्ध नाही. लसीचा ठणठणाट
लातूर : जिल्ह्यातील लसींचा साठा संपला आहे. त्यामुळे मनपा हद्दीतील नऊ केंद्र शनिवारी बंद राहणार आहेत. ६०-७० टक्केच पुरवठा
नागपूर : नागपुरात लसीच्या मागणीच्या तुलनेत ६० ते ७० टक्केच पुरवठा होत आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने लसीकरण होत नसल्याचे चित्र आहे. शहरात सध्या दररोज सुमारे ४९०० ते ५४०० नागरिकांना लस दिली जात आहे. मागणी अधिक मिळते अल्प
अमरावती : शुक्रवारी सायंकाळपर्यंत अनेक केंद्रांवर लस संपली होती. शनिवारी जिल्ह्यात पुन्हा लसींचा ठणठणाट राहील, असे जिल्हा आरोग्य अधिकारी रणमले यांनी सांगितले.
दहा लाख लसींची मागणी मुंबईत दररोज एक लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे पालिकेचे लक्ष्य आहे. त्यामुळे दर आठवड्याला किमान दहा लाख लसींचा साठा मिळावा, अशी मागणी महापालिकेने केंद्राकडे केली आहे. मात्र तीन ते चार दिवसांनी दीड-दोन लाख लसींचा साठा येतो. त्यामुळे लसीकरण मोहीम थंडावली आहे. ठाणे शहरातील ५६ केंद्रांवर लसीकरण बंद होते. संध्याकाळी ५० हजार लसी जिल्ह्याला मिळाल्या. यामुळे शनिवारी लसीकरण सुरू राहील. नवी मुंबईतही शुक्रवारी सर्व ५२ लसीकरण केंद्र बंद होती.
शुक्रवारी लसीकरण ठप्पसोलापूर : शहरातील लसीकरण शुक्रवारी ठप्प होते. २० एप्रिल रोजी शहराला २ हजार ३८ डोस मिळाले. २१ एप्रिल रोजी ३ हजार, तर २२ रोजी ११०० डोस मिळाले. शुक्रवारी एकही डोस मिळाला नाही. लसीकरणासाठी उसळली गर्दी
जळगाव : शहरातील लसीकरण केंद्रांवर प्रचंड गर्दी उसळली होती. महापालिकेच्या शाहू महाराज रुग्णालयात अडीचशे जण वेंटीगला होते.
तीन दिवसांपासून येईना लस अहमदनगर : लसींचा पुरवठा गेल्या तीन दिवसांपासून झाला नसल्याने अनेक लसीकरण केंद्र बंद आहेत. २० एप्रिलला २२ हजार ३१० डोस प्राप्त झाले होते. त्यानंतर मात्र अद्यापपर्यंत लसीचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे बरीचशी केंद्र बंद होती.