- अतुल कुलकर्णीमुंबई : राज्यात आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर अशा १८,४५,००० जणांनी कोरोनाची लस मिळावी म्हणून नोंदणी केली आहे. १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरणाच्या मोहिमेत आजपर्यंत फक्त ३,५४,६३३ जणांनाच लस मिळाली आहे. या गतीने राज्यातील साडेबारा कोटी लोकांना लस मिळायला किती दिवस जातील, याचे उत्तर कोणाकडेही नाही. महाराष्ट्राला भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि सीरमची कोव्हिशिल्ड अशा दोन लसी मिळाल्या आहेत. मात्र, व्हॅक्सिन लस घेण्यास कोणीही तयार नाही.राज्याला आजपर्यंत १९,७२,४०० डोस मिळाले आहेत. मात्र, हे दोन टप्प्यांसाठीचे असल्याने त्याचा लाभ फक्त ९,८६,२०० लोकांनाच होणार आहे. कारण हे डोस दोन टप्प्यांत द्यायचे आहेत. त्यातही कोव्हॅक्सिनचे १,७०,४०० डोस मिळाले असले तरी प्रत्यक्षात फक्त ३,५४५ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ही लस घेतली आहे. त्यामुळे जेवढी नाव नोंदणी झाली आहे त्यांनाही लस मिळण्यास अडचण आहे, तर सामान्यांना ती कधी मिळणार, असे विचारले असता केंद्राकडून लस आली की देणार, असे उत्तर अधिकारी देत आहेत. मंत्रालयातून किती झाली लसीकरणासाठी नोंदणीवैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी वगळता विविध विभाग आणि मंत्रालयातून जवळपास ५,९५,६५६ जणांनी लसीकरणासाठी नाव नोंदणी केली आहे.ज्यात महसूल विभागाच्या ३०,९७४, गृहविभागाच्या २,९६,९८४ आणि गृहनिर्माण व शहरी कामकाज विभागाच्या २,९६,९८४ कर्मचाऱ्यांंचा समावेश आहे.कोणतीही लस घेतली तरी परिणाम सारखाचआम्ही राज्यात जेवढे सेंटर्स सुरू करण्याचे ठरवले होते, त्याच्या अर्धेच सेंटर सुरू करण्यास केंद्राने मान्यता दिली आहे. आम्हाला लस जसजशी उपलब्ध होईल तशी ती देत राहू. ५११ सेंटर्स सुरू करण्याएवढे व्हॅक्सिन आलेले नाहीत. त्यामुळे २८५ सेंटर्स सुरू करू शकलो आहोत. अनेकांचा कल कोव्हिशिल्ड लस घेण्याकडे जास्त आहे; पण दोन्ही लसींचा परिणाम एकसारखाच आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जाणे किंवा अमूक लस चांगली वाईट म्हणणे योग्य नाही. दोन्हीपैकी कोणतीही लस घेतली तरी परिणाम सारखाच आहे.- डॉ. तात्याराव लहाने, संचालक, वैद्यकीय शिक्षणबॉटम फाइव्ह जिल्हे :जिल्हा नोंदणी लस टक्केवारी झालेले घेतलेलेसांगली ३४,५९९ ८,५२५ २४.६४ परभणी १०,५२१ २,६४७ २५.१६ बुलडाणा २२,१२८ ५,६८५ २५.१६ औरंगाबाद ४०,२९४ १०,५८४ २६.२७ पुणे १,१९,००४ ३२,४०१ २७.२३ ज्या पुण्यात सीरम इन्स्टिट्यूटने लस बनवली त्याच पुण्यात लस घेणाऱ्यांचे प्रमाण फक्त २७.२३ टक्के आहे. राज्यात लस घेणाऱ्यांमध्ये पुण्याचा खालून पाचवा नंबर आहे. धुळे जिल्ह्याने मारली बाजीजिल्हा नोंदणी लस टक्केवारी झालेले घेतलेलेधुळे ११,४४१ ६,०८८ ५३.२१ भंडारा ९,१९३ ४,८८६ ५३.१५ मुंबई १,७५,२२२ ५७,५८५ ४९.४३ वाशिम ६,७१९ ३,०८५ ४५.९१ वर्धा २१,४४९ ९,१९७ ४२.८८
Corona Vaccine: 19 लाख कर्मचाऱ्यांची नोंदणी, फक्त 3.5 लाख जणांनाच लस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2021 2:50 AM