शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

Corona Virus: चिंता वाढली! राज्यात पुन्हा १० हजार रुग्ण!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2021 6:38 AM

Corona Virus: राज्यातील सर्व व्यवहार सुरळीत झाले असतानाच कोरोनाच्या वाढत्या संख्येने पुन्हा आरोग्य यंत्रणेसमोर समस्या उभी केली आहे. राज्यातील एकूण रुग्णांचे प्रमाण जानेवारी महिन्यात दोन ते अडीच हजारांच्या घरात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून, शुक्रवारी दिवसभरात रुग्ण संख्येने १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. शुक्रवारी तब्बल १०,२१६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक १,२२५ रुग्ण हे नागपूरमध्ये नोंदण्यात आले आहेत. तर, मुंबईत १,१७४ रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण ५३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यातील सर्व व्यवहार सुरळीत झाले असतानाच कोरोनाच्या वाढत्या संख्येने पुन्हा आरोग्य यंत्रणेसमोर समस्या उभी केली आहे. राज्यातील एकूण रुग्णांचे प्रमाण जानेवारी महिन्यात दोन ते अडीच हजारांच्या घरात आले होते. फेब्रुवारी महिन्यात रुग्णसंख्या वाढू लागली. शुक्रवारी रुग्णसंख्येने १० हजारांचा टप्पा ओलांडला. यापूर्वी ऑक्टोबर २०२०मध्ये कोरोना रुग्णांचा आकडा १० हजारांवरून हळूहळू खाली येऊ लागला होता.

वाढत्या रुग्णसंख्येत मुंबई महानगर प्रदेश २१३५, पुणे ८४९, पिंपरी ५४९, अमरावती ४३५, नाशिक ३५२, औरंगाबाद ३१८ आणि जळगाव येथील ३१५ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात राज्यात ६,४६७ रुग्ण बरे झाले. आताच्या घडीला राज्यात ८८,८३८ एवढे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या