मुंबई : राज्यात नव्या कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत आता घट होताना दिसत आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत २९ हजार ९११ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात ४७ हजार ३७१ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.४३ टक्के इतके आहे. मात्र, कोरोना मृत्यूचा आकडा हा कालच्या तुलनेत आज वाढला आहे. गेल्या २४ तासांत ७३८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. (Maharashtra reports 29,911 new COVID19 cases, 47,371 recoveries and 738 deaths in the last 24 hours)
राज्यात गेल्या २४ तासांत २९ हजार ९११ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ७३८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५४ लाख ९७ हजार ४४८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ८५ हजार ३३५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ३ लाख ८३ हजार २५३ जणांवर उपचार सुरू आहेत.
आज राज्यात ४७ हजार ३७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण ५० लाख २६ हजार ३०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.४३ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५५ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी २१ लाख ५४ हजार २७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५४ लाख ९७ हजार ४४८ (१७.०९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २९ लाख ३५ हजार ४०९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २१ हजार ६४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत १ हजार ४२५ नवीन कोरोना बाधितांची नोंद मुंबईत आज १ हजार ४२५ नवीन कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर एकूण ५९ जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आज केवळ १ हजार ४६० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मंबईत आज एकूण २९ हजार ३९१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील १ हजार ४२५ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. मुंबईत सध्या २९ हजार ५२५ अँक्टिव्ह रुग्ण आहेत.
पुण्यात ९३१ नागरिकांना कोरोनाची लागणपुण्यात दिवसभरात ९३१ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ६६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिवसभरात १०७६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. पुण्यात एकूण रूग्णसंख्या ४६३१०३ आहे.