शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

CoronaVirus: राज्यात कोरोनाचे ५८३ नवे रुग्ण, बाधितांचा आकडा १०,४९८ वर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 9:48 PM

Corona virus: आज झालेल्या मृतांपैकी 20 जण मुंबईतील आहेत. तर पुण्यातील तीन आणि ठाण्यातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई : राज्यात कोरोना बाधितांचा आकडा दहा हजारांवर पोहोचला आहे. राज्यात गुरुवारी 583 कोरोना रुग्णांचे निदान झाले, तर एकूण रुग्णसंख्या 10 हजार 498 इतकी झाली. तर आज राज्यात 27 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामुळे राज्यात कोरोनाने झालेल्या मृत्यूंची संख्या 459 वर पोहोचली आहे. दरम्यान, आज झालेल्या मृतांपैकी 20 जण मुंबईतील आहेत. तर पुण्यातील तीन आणि ठाण्यातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

राज्यात आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या 1 लाख 45 हजार 798 नमुन्यांपैकी 1 लाख 34 हजार 244 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 10,498 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 68 हजार 266 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 10 हजार 695 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 1773 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान, आज झालेल्या मृत्यूंपैकी 19 पुरूष तर 8 महिला आहेत. त्यातील 14 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 13 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 31 रुग्णांपैकी 22 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.

महाराष्ट्र एकूण रूग्ण – 10,498

मृत्यू - 459

मुंबई महानगरपालिका- 7061 (मृत्यू 290)

ठाणे- 48 (मृत्यू 2 )

ठाणे महानगरपालिका- 412 (मृत्यू 6)

नवी मुंबई मनपा- 174(मृत्यू 3)

कल्याण डोंबिवली- 163 (मृत्यू 3)

उल्हासनगर मनपा - 3

भिवंडी, निजामपूर - 17

मिरा-भाईंदर- 126 (मृत्यू 2)

पालघर- 41 (मृत्यू 1 )

वसई- विरार- 128(मृत्यू 3)

रायगड- 24

पनवेल- 47 (मृत्यू 2)

नाशिक - 6

नाशिक मनपा- 20

मालेगाव मनपा - 171 (मृत्यू 12)

अहमदनगर- 26 (मृत्यू 2)

अहमदनगर मनपा - 16

धुळे - 8 (मृत्यू 2)

धुळे मनपा - 17 (मृत्यू 1)

जळगाव- 30 (मृत्यू 8)

जळगाव मनपा- 10 (मृत्यू 1)

नंदुरबार - 11 (मृत्यू 1)

पुणे- 63 (मृत्यू 3)

पुणे मनपा- 1113 (मृत्यू 82)

पिंपरी-चिंचवड मनपा- 72 (मृत्यू 3)

सातारा- 32 (मृत्यू 2)

सोलापूर- 7

सोलापूर मनपा- 92 (मृत्यू 6)

कोल्हापूर- 9

कोल्हापूर मनपा- 5

सांगली- 28

सांगली, मिरज, कुपवाड मनपा- 1 (मृत्यू 1)

सिंधुदुर्ग- 2

रत्नागिरी- 8 (मृत्यू 1)

औरंगाबाद -2

औरंगाबाद मनपा- 129 (मृत्यू 7)

जालना- 2

हिंगोली- 15

परभणी मनपा- 2

लातूर -12 (मृत्यू 1)

उस्मानाबाद-3

बीड - 1

नांदेड मनपा - 3

अकोला - 12 (मृत्यू 1)

अकोला मनपा- 27

अमरावती- 2

अमरावती मनपा- 26 (मृत्यू 7)

यवतमाळ- 79

बुलढाणा - 21 (मृत्यू 1)

वाशिम - 2

नागपूर- 6

नागपूर मनपा - 133 (मृत्यू 1)

भंडारा - 1

चंद्रपूर मनपा - 2

गोंदिया - 1

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 733 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून एकूण 10,092 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 42.11 लाख लोकांचे सर्वेक्षण केले आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस