लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचा प्रसार गेल्या महिन्यापासून वाढू लागल्यानंतर सक्रिय रुग्णांचा आकडा ९,६३३ वर पोहोचला आहे. यापैकी ८० टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत. मात्र, अत्यवस्थ रुग्णांची संख्या वाढली असून, सध्या ३७३ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.
मुंबईत मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला. आतापर्यंत ३ लाख २७ हजार ६१९ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी तीन लाख पाच हजार ६३९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, तर ११ हजार ४७६ लोकांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनाचा प्रसार पूर्णपणे नियंत्रणात आल्याचे वाटत असतानाच गेल्या महिन्यापासून बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे.
दररोज आठशे ते एक हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. मात्र, ९,६३३ सक्रिय रुग्णांपैकी ३,२४८ रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पालिका व खाजगी रुग्णालयांत उपचार होत आहेत. सध्या रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.२९ टक्का एवढा आहे, तर रुग्णसंख्या २३५ दिवसांनंतर दुप्पट होत आहे.
...अशी आहे सद्य:स्थितीप्रकार उपलब्ध खाटा दाखल रुग्ण रिक्तसाधारण खाटा ११,४८६ ३,५३१ ७,९५५ अति दक्षता १,५५७ ७१२ ८४५ ऑक्सिजन ८,०३३ २,०३१ ५,९९६व्हेंटिलेटर ९४५ ४६७ ४७८
मुंबईत १ हजार १०३ रुग्ण; तर पाच जणांचा मृत्यू मुंबई : मुंबईत गुरुवारी १,१०३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. एकूण बाधितांची संख्या ३ लाख २९ हजार ८४३ एवढी आहे. गुरुवारी ६५४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत ३ लाख ७० हजार २७ रुग्ण काेराेनामुकत झाले. दिवसभरात ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ११ हजार ४८७ इतकी झाली आहे.