मुंबई : महाराष्ट्रातही कोरोनाचा शिरकाव झाला असून या विषाणूचा होत असलेल्या फैलावामुळे जगभरात ठप्प होत असलेल्या अर्थव्यवस्था, खनिज तेलाच्या दरात घट आणि जगभरातील शेअर बाजारांमधील घसरण यामुळे मुंबई शेअर बाजार सोमवारी गडगडला. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक काही काळ २४६७ अंशांनी गडगडला होता. त्यानंतर सुधारणा होत बाजार बंद होताना हा निर्देशांक १९४१ अंशांनी घसरला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या निफ्टीमध्येही घसरण झाली. निर्देशांक १०,५०० अंशांची पातळीही राखू शकला नाही.दुपारी १.३० वाजेच्या सुमारास हा निर्देशांक २४६७ अंशांनी गडगडलेला दिसून आला. जगभरातील शेअर बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याने सर्वच प्रमुख निर्देशांकांमध्ये घसरण होत आहे. त्याचा विपरित परिणाम आशियातील देशांप्रमाणेच भारतीय शेअर बाजारांवर होत आहे.
पुण्यातील दाम्पत्याला लागणकोरोनाचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण पुण्यात आढळला. दुबईहून आलेल्या पती-पत्नीला कोरोना झाल्याचे राष्ट्रीय विषाणू संस्थेने स्पष्ट केले. नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एका खासगी टूर कंपनीसोबत ते जागतिक पर्यटनाला गेले होते. त्यांच्यासोबत दोन मुलांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. या टूरमधील ४० जणांचा शोध आरोग्य विभागाला घ्यावा लागणार आहे. दोन मुलांचा तपासणी अहवाल मंगळवारी येईल. नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.खनिज तेलातील घसरणीमुळे मोठा फटकाआंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खनिज तेलाच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याचा फटका भारतामधील तेल कंपन्यांना बसला. ओएनजीसीच्या समभागांमध्ये सर्वाधिक १६ टक्क्यांची तर रिलायन्सच्या किमतीमध्ये १२ टक्क्यांनी घट झाली. अडचणीत आलेल्या येस बॅँकेचे ४९ टक्के समभाग खरेदी करणार असल्याची घोषणा भारतीय स्टेट बॅँकेने केली. त्यामुळे त्यांच्या समभागांमध्ये ६ टक्क्यांहून अधिक घट झाली. याउलट येस बॅँकेच्या समभागांमध्ये ३१ टक्क्यांची वाढ झाली आहे.बाजार पडण्यामागची इतर कारणेकोरोना व्हायरस : कोरोनाची बाधा जगभरात एक लाखाहून अधिक लोकांना झालेली आहे. मृतांची संख्याही दररोज वाढत आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरातील २.४ ट्रिलियन डॉलरच्या उत्पादनाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.परकीय वित्तसंस्थांकडून विक्रीपरकीय वित्तसंस्थांनी भारतीय बाजारात विक्रीचे धोरण अवलंबिल्याने बाजाराच्या घसरणीला हातभार लागत आहे. गेल्या १५ सत्रांमध्ये या वित्तसंस्थांनी भारतीय भांडवल बाजारातून २१,९३७ कोटी काढून घेतले. या संस्थांनी ईटीएफमधील गुंतवणूकही काढून घेतल्याने बाजारात असलेली घबराट आहे.बॅँकिंग क्षेत्राचे स्थैर्ययेस बॅँकेच्या प्रकरणामुळे देशातील बॅँकिंग क्षेत्राच्या स्थैर्याबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांच्या चिंतेमध्ये वाढ झाली असून, बॅँकांच्या समभागांची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळेही बाजारातील घसरण तीव्र झाली.जगभरातील शेअर बाजारांमधील वातावरण : जगभरातील शेअर बाजारांमध्ये सध्या भीतीचे वातावरण असल्यामुळे तेथे सर्वत्र निर्देशांक घसरत आहेत. त्याचे प्रतिबिंब भारतीय शेअर बाजारातही दिसून येत आहे. अमेरिकेतील डो जोन्स, जपानचा निक्की यांच्यासह आशिया-प्रशांत क्षेत्रातील शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण दिसून आली. त्याच्या प्रभावामुळे भारतामधील शेअर बाजारही पडला.