शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

Corona virus : माजी आमदारांची एक महिन्याची पेन्शन कापून घ्या : रामदास फुटाणे 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2020 12:05 PM

शासनाला सहकार्य करणे हे लोकप्रतिनिधींचेदेखील कर्तव्य आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली मागणी

पुणे : शासनाच्या सहकार्यासाठी आता लोकप्रतिनिधीदेखील पुढे सरसावले आहेत. कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती असल्यामुळे लोकप्रतिनिधी या नात्याने सर्व माजी आमदारांची एक महिन्याची पेन्शन कापून घ्यावी, अशी मागणी माजी आमदाररामदास फुटाणे यांनी मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. या मागणीच्या पार्श्वभूमीवर, पुण्यातील इतर माजी आमदारांनीही आपली एक महिन्याची पेन्शन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याची तयारी दर्शविली.कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी मदतीकरिता उद्योग, चित्रपट, क्रीडाक्षेत्रातील मंडळींनी खारीचा वाटा उचलला आहे. या संकट काळात ‘माणुसकी’चे दर्शन घडत आहे. शासनाला सहकार्य करणे हे लोकप्रतिनिधींचेदेखील कर्तव्य आहे. याच भावनेतून माजी आमदार रामदास फुटाणे यांनी सर्व आमदारांची एक महिन्याची पेन्शन कापून घ्यावी, अशा मागणीचे पत्र मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना दिले आहे.  ‘लोकमत’ने काही माजी आमदारांशी संपर्क साधला असता त्यांनीही आपली कोणतीच हरकत नसल्याचे स्पष्ट केले.

.....................सरकारी कर्मचाºयांचा जर २५ ते ३० टक्के पगार कापला जातो; मग आमच्या लोकप्रतिनिधींचेदेखील काहीतरी कर्तव्य आहे. माझ्या या मागणीला एकही माजी आमदार विरोध करणार नाही, याची खात्री आहे. एकदा मंत्रिमंडळाने निर्णय घेतला, की कुणी काही बोलणार नाही. आता या संकट काळात प्रत्येकाने आपल्या गरजा कमी केल्या पाहिजेत आणि ही राष्ट्रीय आपत्ती समजून प्रत्येकाने आपापल्या परीने शासनाला सहकार्य केले पाहिजे.- रामदास फुटाणे, माजी आमदार..........आमची माजी आमदारांची असोसिएशन आहे. मी तर देणारच आहे; पण सगळ्या माजी आमदारांनादेखील आवाहन करतो त्यांनी आपली एक महिन्याची पेन्शन मुख्यमंत्री साह्यता निधीला द्यावी. लोकांना केवळ सांगून उपयोग नाही. ते कृतीतून दाखविले पाहिजे.- बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार.............मी बाळासाहेब थोरातांना हे पूर्वीच म्हटले होते, की तुम्ही स्वत: माजी आमदारांना हे आवाहन करा. त्यांच्या पेन्शनमधून कमीत कमी १० ते २५ हजारांपर्यंतची रक्कम तरी  कापून घ्या. कारण काही आमदार असे असू शकतात, की जे उतारवयातले आहेत त्यांना बघायला कुणी नाही. म्हणून सरसकट न घेता काही रक्कम कापून घेण्यात यावी. आजमितीला एक टर्म पूर्ण केलेल्या माजी आमदाराला ५० हजार रुपये पेन्शन मिळते. त्यातील किमान २५ हजार रुपयांची रक्कम कापून घेऊन ती देण्यात यावी.- उल्हास पवार, माजी आमदार 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMLAआमदारramdas phutaneरामदास फुटाणेUddhav Thackerayउद्धव ठाकरे