मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मागील काही दिवसांत दैनंदिन रुग्णसंख्येत कमालीची घट झाली असून मृत्यूंचे प्रमाणही कमी झाले आहे. राज्यात सोमवारी १०,२१९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १५४ मृत्यू झाले आहेत.
राज्यात सध्या १,७४,३२० सक्रिय रुग्ण असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात २१,०८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ५५,६४,३४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२५ टक्के, तर मृत्युदर १.७२ टक्के आहे. राज्यात १२,४७,०३३ व्यक्ती होमक्वारंटाइन तर ६,२३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
मुंबईत ७२८ रुग्णमुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९५ टक्के आहे, तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५५० दिवसांवर पोहोचला आहे. ३१ मे ते ६ जूनपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.१२ टक्के आहे. शहर उपनगरात सध्या १५ हजार ७८६ सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत दिवसभरात ७२८ रुग्ण आणि २७ मृत्यू झाले. तर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ९८० आहे.