पुण्यात लहान मुलांना आजारी पाडणारा एडिनोव्हायरस या संसर्गजन्य आजाराचे थैमान सुरु असताना आता राज्य़भरात कोरोनाही डोके वर काढू लागल्याने चिंता वाढू लागली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे रुग्ण दुप्पटीने वाढले आहेत. एवढेच नाही तर राज्यात दोन रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत 1.48 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी राज्यात 155 नवीन रुग्ण सापडले आहेत. सोमवारी ६१ कोरोनाबाधित सापडले होते. राज्यात आतापर्यंत 81,38,653 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. H3N2 या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण वाढत चालले आहेत. यामुळे कोरोना, एडिनो आणि इन्फ्लुएन्झाचे असा तिहेरी फटका बसू लागला आहे.
पुणे परिसरात कोरोनाचे 75 नवे रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईत 49, नाशिकमध्ये 13, नागपूरमध्ये 8 आणि कोल्हापुरात 5 रुग्ण आढळले आहेत. औरंगाबाद, अकोला येथे प्रत्येकी दोन आणि लातूरमध्ये 1 रुग्ण आढळून आला आहे. पुण्यात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ६८ रुग्ण बरे झाले आहेत.
राज्यभरात 662 एक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी २०६ पुण्यात आहेत. तर मुंबईत 144 रुग्ण आहेत. ठाण्यात ९८ रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 402 रुग्ण आढळले आहेत. सध्याची रुग्णसंख्या ही 3903 झाली आहे. 13 मार्च रोजी देशात 444 रुग्ण आढळले होते, तर 12 मार्च रोजी 524 रुग्ण आढळले होते.