राजानंद मोरे - पुणे : राज्यातील कोरोना विषाणूबाधित दहाव्या रुग्णाचा मृत्यू सोमवारी पुण्यात झाला. या नऊमधल्या जवळपास सगळ्यांनाच मधुमेह व उच्च रक्तदाब हे आजार होते.तसेच त्यातील सहा जणांचे वयसाठीच्या पुढे होते. यावरून मधुमेह,उच्च रक्तदाब, हृदयरोग यांसह अन्य आजार असलेल्या कोरोनाबाधित व्यक्तींना मृत्यूचा धोका अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या अतिजोखमीच्या (हाय रिस्क) गटातील व्यक्तींनी अधिक दक्षता घेणे आवश्यकअसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.पुण्यात सोमवारी खासगी रुग्णालयात ५२ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला . या रुग्णाला आधीपासूनच मधुमेह व उच्च रक्तदाब होता. त्यातच कोरोना विषाणूची लागण झाल्याने त्यांची प्रकृतीअधिकच बिघडत गेली. अखेरकोरोनाच त्यांच्या मृत्यूला कारणीभूतठरला. राज्यात यापूर्वी झालेला आठ जणांचा मृत्यूही असाच झाला आहे.मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास होता.त्यातील दोघांचे वय ४0 व ४५ आणिएकाचे ५२ वर्षे होते.कोरोना विषाणूमुळे जगभरात झालेल्या मृत्यूमध्ये ९0 टक्के जणांना असे आजार होते. या आजारांमुळे त्यांच्यातील प्रतिकारशक्ती कमी झाल्याने ते बरे होऊ शकले नाहीत. आता तेच चित्र आपल्याकडेही दिसत आहे.याविषयी बोलताना इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, मधुमेह, उच्च रक्तदाब,हृदयरोग, एड्स, कर्करोगावर सुरूअसेल उपचार यासह इतर दुर्धर आजारामध्ये माणसाची प्रतिकारशक्ती खूप कमी होते. त्यामुळे त्यांच्या शरीरातील पेशी विषाणूंचा प्रतिकार करण्यास कमी पडतात. परिणामी त्यांच्यातील आजार बळावत जातो.गर्भवती महिलांनाही हा धोका असतो.त्यामुळे या सर्व व्यक्ती अतिजोखमीच्या गटात येतात.तसेच ६५ पेक्षा अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिकही या गटात येतात. जगभरात हेच चित्र दिसून येत आहे. त्यासाठी या व्यक्तींनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. ............
राज्यातील मृत्यू झालेल्या रुग्णांची स्थितीक्र. वय आजार१. ६४ (पुरुष) उच्च रक्तदाब२. ६३ (पुरुष) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग३. ६५ (पुरुष) अनियंत्रित मधुमेह, उच्च रक्तदाब४. ६५ (महिला) मधुमेह, उच्च रक्तदाब५. ६५ (महिला) उच्च रक्तदाब६. ८५ (पुरुष) मधुमेह, पेसमेकर७. ४० (महिला) उच्च रक्तदाब८. ४५ (पुरुष) मधुमेह९. ५२ (पुरुष) मधुमेह, उच्च रक्तदाब१०. ७८ (पुरुष) उच्च रक्तदाब, हृदयरोग..........जगातील ९0 टक्के कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू हे आधी कोणता ना कोणता आजार असल्याने झाले आहेत. आधी गंभीरआजार असल्यानंतर कोरोना विषाणूची लागण झाल्यास गुंतागूंत अधिक वाढत जाते. त्यामुळे मृत्यूची संख्या वाढते.राज्यातील झालेले हे मृत्यूही आधी आजार असलेल्या व्यक्तींचेच झाले आहेत.
- डॉ. प्रदीप आवटे,प्रमुख, राज्य साथरोग नियंत्रण विभाग