मुंबई : राज्यात दर दिवशी जवळपास ७००-८०० च्या घरात वाढत चाललेली कोरोना रुग्णांची संख्या पाहता उद्या संपणारा केंद्र सरकारचा लॉकडाऊन वाढविण्याची वेळ राज्य सरकारवर आलेली आहे. राज्यात मुंबई-पुणे सर्वाधिक बाधित असले तरीही उपराजधानी नागपूरमध्येही रुग्णांचा आकडा ४९ वर गेलेला आहे. यामुळे राज्यात उद्यापासून पुढील दोन आठवडे म्हणजेच ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
याची अधिसूचना आज आज काढण्यात आली असून २५ मार्चला केंद्र सरकारने काढलेल्या लॉकडाऊनच्या आदेशाला मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये २५ मार्चला सुरु झालेले लॉकडाऊन आता ३० एप्रिलपर्यंत राहणार असल्याचे म्हटले आहे. हे लॉकडाऊन १४ एप्रिलनंतर रात्री १२ वाजल्यापासून सुरू राहणार आहे. दरम्यान, कोरोना रुग्णसंख्येनुसार महाराष्ट्राची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. ग्रीन आणि आॅरेंज झोनमधील जिल्ह्यांमधील खबरदारीची उपाययोजना करून उद्योग व व्यवहार सुरू करण्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी शनिवारी व्हिडीओ संवाद साधला. याच संवादात कोरोना रुग्णसंख्येनुसार जिल्हा व प्रमुख महानगरांची तीन भागांत विभागणी करण्याचे निर्देश दिले होते. येत्या एक - दोन दिवसांत केंद्राकडून याबाबतच्या मार्गदर्शक सूचना आल्यानंतर यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.
ग्रीन आणि आॅरेंज झोनमध्ये काही उपाययोजना करून येथील व्यवहार सुरू करता येऊ शकतात. त्यानुसार या झोनमधील जिल्ह्यांच्या सीमा सील करून तेथील उद्योग आणि व्यवहार सुरू करण्यावर चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना हाती येताच तसा निर्णय होऊ शकतो. जे उद्योग आपल्या कारखान्यात सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची हमी देतील, तेथे तशी व्यवस्था करतील आणि कामगारांची व्यवस्था कारखान्यातच करतील, असे उद्योग सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचेही टोपे म्हणाले. मात्र, ‘रेड झोन’मधील जिल्ह्यांत ‘लॉकडाउन’ अधिक कडक करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली आहे. केंद्राने काही प्रमाणात ‘लॉकडाउन’ शिथिल केले तरी मुंबई, पुणे, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात ‘लॉकडाउन’ शिथिल होणे कठीण असल्याचे संकेत आरोग्यमंत्री टोपे यांनी दिले आहेत. मात्र, अद्याप यावर स्पष्टीकरण आलेले नाही. यामुळे लॉकडाऊनची सावट या सर्व झोनवर राहण्याची शक्यता आहे.
मोदी सरकार मोठा दिलासा देणार; लॉकडाऊन काळात 'दुकाने', उद्योग सुरु ठेवण्याची मुभा
आय अॅम सॉरी! गंगा किनारी १० परदेशी फिरताना सापडले; शिक्षा पाहून 'हसाल'
बापरे! केवळ 8 जणांनी तब्बल १९०० जणांना केले कोरोना पॉझिटिव्ह
भारतात 'कोरोना बॉम्ब' फोडण्याच्या तयारीत; नेपाळच्या राजकारण्याला अटक