मुंबई :महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता दीड लाखांच्याही पुढे गेला आहे. येथे नव्या रुग्णांच्या संख्येत दिवसागणीक विक्रमी वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी, कोरोनावरील काही औषधं शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध करून देण्याचा विचार शासन स्तरावर सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे म्हणाले, “कोणत्याही औषधाच्या बाबतीत आपण मागे नाही. आपण सर्व आवश्यक औषधांचा वापर करत आहोत. रेमडेसिवीर आणि फेविपिराविर औषधांसाठी आपण मार्च, एप्रिलपासूनच पाठपुरावा करत होतो. त्याची परवानगी मिळाली आहे. आता फेविपिराविर, रेमडेसिवीर, टॅझिलोझुमा, एचसीक्यू आणि डॉक्सी आदी कोरोनावरील औषधं शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध करून देण्याच्या विचार शासन करत आहे. मात्र, त्यासाठी केंद्राची परवानगी आणि औषधांची उपलब्धताही तेवढीच महत्त्वाची आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले."
तुटवडा भासू देणार नाही -रेमडेसिवीरसारखी औषधं राज्य सरकार उपलब्ध करून देईल, तुटवडा भासू देणार नाही. ही औषधं शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयांत मोफत उपलब्ध करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जाईल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
जुलै महिन्यात अनलॉकमध्ये आणखी काय शिथिलता मिळणार याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनेतशी संवाद साधत कोरोनाविरुद्धतली पुढील रणनिती सांगितली. 30 जूननंतर लॉकडाउन उठणार नाही, असे स्पष्ट शब्दात उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनेतला आवाहन केले, की अद्याप काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनाचे संकट अद्यापही टळलेले नाही. सध्या आपण कात्रीत सापडलो असून अर्थचक्राला गती देण्यासाठी आपम मिशन बिगेन अगेन सुरू केले आहे, असेही त्यांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या -
Good news: लवकरच संपणार कोरोनाचा कहर?; "वर्षभरात येऊ शकते कोरोना व्हॅक्सीन"
CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा
CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा
CoronaVirus News: "जगातील 'या' 170 कोटी लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका", 'हे' आहे कार