राजानंद मोरे/निनाद देशमुखपुणे : कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढण्याबरोबरच पुणे जिल्ह्यात ऑक्सिजनची मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. राज्याच्या एकुण मागणीच्या तुलनेत जिल्ह्यातच जवळपास २७ टक्के आॅक्सिजन लागत आहे. सध्याची पुण्याची गरज सुमारे २२० मेट्रिक टन एवढी असून राज्यात सुमारे ८१० मेट्रिक टन ऑक्सिजन लागत आहे. विदर्भ, मराठवाडा व खान्देशात लागणाऱ्या ऑक्सिजनएवढा पुरवठा एकट्या पुण्याला करावा लागत आहे.
राज्यात सर्वाधित कोरोनाबाधित रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. शनिवारपर्यंत जिल्ह्यातील रुग्णांचा आकडा जवळपास २ लाख २० हजारांच्या पुढे गेला आहे. तर पावणे दोन लाख रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्यात सर्वाधिक कोविड रुग्णालयेही पुण्यात आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या डॅशबोर्डनुसार, सध्या रुग्णालयात ऑक्सिजन तसेच आयसीयुमध्ये असलेल्या रुग्णांचा आकडा ६ हजारांहून अधिक आहे. इतर जिल्ह्यातील रुग्णही पुण्यात उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ऑ क्सिजनची मागणी दिवसेदिवस वाढत चालली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, राज्याला सध्या दररोज सुमारे ८०९ मेट्रिक टन आॅक्सिजनची गरज भासते. त्यामध्ये एकट्या पुण्याचा वाटा २२० मेट्रिक टन एवढा आहे. हा आकडा राज्याच्या एकुण मागणीच्या एक चतुर्थांश आहे. तसेच मराठवाडा व विदर्भासह खान्देशात लागणाºया आॅक्सिजनएवढा आॅक्सिजन पुणे जिल्ह्याला पुरवावा लागत आहे.
पुण्यापाठोपाठ मुंबई (९१.३१४), ठाणे व पालघर (८५.५१०), नाशिक (५८.५००) आणि कोल्हापुर (५०) या जिल्ह्यांना सर्वाधिक ऑक्सिजनची गरज भासत आहे. विभागनिहाय आकडे पाहिल्यास पुणे विभागाला सर्वाधिक ३३३.७८ मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा करावा लागत आहे. त्यापाठोपाठ नाशिक आणि ठाणे विभाग आहे. बहुतेक विभागांमध्ये दैनंदिन गरज व ऑक्सिजन पुरवठ्यामध्ये तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे काही भागात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे.-------------------------ऑक्सिजनची सर्वाधिक मागणी असलेले जिल्हेजिल्हा मागणी (मेट्रिक टन)पुणे २२०मुंबई ९१.३१४ठाणे/पालघर ८५.५१०नाशिक ५८.५००कोल्हापुर ५०----------------------राज्यातील विभागनिहाय ऑक्सिजनची गरज व पुरवठा (दि. १२ सप्टेंबर) -विभाग कोविड रुग्णालये दैनंदिन गरज (मेट्रिक टन) पुरवठा साठापुणे ४०८ ३३३.७८ ३२५.७६ ११५.९अमरावती २२ २६.५६६ २६.३४० ४.५३औरंगाबाद ७६ ७४.८३० ४७.८९२ २६.५६८नागपूर ६० ५२ ६१ ७९नाशिक २७० ११५.७४० ९४.३०० १९.४मु्ंबई ५४ ९१.३१४ १०३.९८६ १२.६७२ठाणे ११२ ११४.९९० १०६.५७० १२२.०८६------------------------------------------------------------------------एकूण १००२ ८,०९.२२ ७,६५.८४८ ३८०.१६------------------------------------------------------------------------ सहा कंपन्यांना वैद्यकीय क्षेत्रासाठी ऑक्सिजन निर्मितीचे परवाने देण्यात आले आहेत. ऑक्सिजनच्या वाहतूकीसाठी साधा टँकर लागत नाही. त्यासाठी क्रायोजनिक टॅकर लागतो. तो आपलयाकडे नव्हता. त्याची वाहतूक करणेही धोकादायक असते. या टॅकरची अडचण सध्या जाणवत आहेत. सध्या एका बेडसाठी तीन सिलेंडर लागतात. एक सिलेंडर कनेक्ट असणार आहे. दुसरा सिलेंडर स्टोअरेजसाठी तर तिसरा सिलेंडर बॉटलींग युनिककडे असणार आहे. याचे मॅनेजमेंट करन्याच्या सुचना दवाखान्यांना दिल्या आहेत. पुण्यात डीपीडीसीमधून ५०० सिलेंडरचे ऑर्डर दिली आहे. आता पुन्हा ५०० सिलेंडरसाठी निधी देण्यात येणार आहे. या सिलेंडरची निर्मिती पुण्यात होत नाही. ती गुजरात व ठाण्यात होते. वाहतूक आणि सिलेंडर या प्रमुख अडचणी आहेत. आणि तिसरी अडचण म्हणजे पुण्यात तयार होणारा ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ण विभागात करायचा असतो. यामुळे तुटवडा जाणवत आहे.- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे व विभागीय ऑक्सिजन पुरवठा समन्वयक