पुणे : कोरोना संकटामुळे वाहन विक्रीत तब्बल ७० टक्के घट झाली आहे. राज्यात मुंबई व ठाण्यानंतर पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मात्र, सध्याच्या परिस्थितीतही राज्यात पुण्यातच सर्वाधिक वाहन विक्री झाली आहे. तर त्या पाठोपाठ पिंपरी चिंचवडचा क्रमांक लागतो. दरवर्षी राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) पुणे कार्यालयामध्ये (एमएच १२) सर्वाधिक वाहन नोंदणी आणि महसुुल जमा होतो. मागील वर्षी पुण्यात २ लाख ४४ हजार ९८३ वाहनांची विक्री झाली होती. राज्याच्या तुलनेत हे प्रमाण १० टक्के एवढे आहे. राज्यात जवळपास ५० आरटीओमधून सुमारे २३ लाख १० हजार वाहनांची नोंद झाली होती. यावर्षी मार्च महिन्यापर्यंत वाहन विक्री जोमाने सुरू होती. पण मार्च अखेरीस लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मे महिन्यापर्यंत वाहन विक्री जवळपास ठप्प झाली. जून महिन्यात कार्यालये पुन्हा सुरू झाल्यानंतर वाहन खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडू लागले. पुण्यामध्ये मुंबई व ठाण्यापाठोपाठ कोरोनाचे संकट गडद असल्याने वाहन विक्रीवर विपरीत परिणाम दिसून आला. पण तरीही अन्य ‘आरटीओ’च्या तुलनेत पुण्यात सर्वाधिक वाहन विक्री झाल्याचे आकडेवारीवरून दिसते.
पुण्यात एकट्या मार्च महिन्यातच जवळपास २१ हजार वाहनांची विक्री झाली होती. तर एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत पुण्यात सुमारे साडे बारा हजार वाहनांची नोंदणी झाली. त्यापाठोपाठ पिंपरी चिंचवड ८,७३७, नाशिक ६,९७८, कोल्हापूर ४,१९१ आणि ठाणे ४२६० या आरटीओचा क्रमांक लागतो. पुण्यात कोरोना रुग्णसंख्या अधिक असूनही सर्वाधिक वाहन विक्री होत असल्याचे चित्र आहे. ------------- मागील वर्षीच्या तुलनेत ७० टक्के घटकोरोनामुळे देशभरातील वाहन विक्रीत ६५ ते ७० टक्के घट दिसून आहे. तेच चित्र महाराष्ट्र आणि पुण्यातही पाहायला मिळत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात आतापर्यंत वाहन विक्रीत ६५ टक्क्यांनी तर पुण्यात ७० टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून येत आहे. पुण्यात जानेवारी ते जुलै या कालावधीत सुमारे पाऊण लाख वाहनांचीच विक्री झाली आहे.------------------एप्रिल ते जुलै (दि. २३ जुलैपर्यंत) कालावधीतील वाहन विक्री(स्त्रोत - वाहन डॅशबोर्ड)आरटीओ वाहन विक्रीपुणे (१२) १२,६२९पिंपरी चिंचवड (१४) ८,७३७नाशिक (१५) ६,९७८कोल्हापूर (९) ४,१९१ठाणे (४) ४२६०-------------------------पुण्यातील (एमएच १२) वाहन विक्री (स्त्रोत - वाहन डॅशबोर्ड)महिना वाहन विक्रीजानेवारी २३,४४४फेब्रुवारी १७,०६५मार्च २०,८०६एप्रिल १,०३४मे ६५८जून ५,९३४जुलै ५,००३-------------------एकुण १२,६२९-------------------