शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

CoronaVirus राज्यात आणखी १४ बळी; ७४८ पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 6:36 AM

२४ तासांत ११३ रुग्णांची भर : वाढता संसर्ग रोखण्याचे राज्य सरकारसमोर आव्हान

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या ११३ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांची संख्या ७४८ झाली आहे. कोरोनावर नियंत्रणाचे नवे आव्हान सरकारसमोर उभे आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या शनिवारी ३२ होती. रविवारी कोरोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा ४६ वर जाऊन पोहोचला.आजपर्यंत पाठविलेल्या १६,००८ नमुन्यांपैकी १४,८३७ जणांचे नमुने कोरोना निगेटिव्ह आले, तर ७४८ पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ५६ रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडले आहे. सध्या ४६,५८६ घरगुती अलगीकरणात तर ३१२२ जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

१० लाखांहून अधिक जणांचे सर्वेक्षणराज्यात जिथे रुग्णांचे क्लस्टर सापडले तिथे केंद्राच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृती योजना अमलात आणण्यात येत आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात यासाठी ५१९ टीम तर पुणे महापालिका क्षेत्रात ४३९ टीम कार्यरत आहेत. नागपूर मनपामध्ये २१० टीम सर्वेक्षण करत आहेत. नवी मुंबईत १९६ टीम नियुक्त आहेत. एकूण ३,०७८ पथके कार्यरत असून त्यांनी १० लाखांहून अधिक लोकांचे सर्वेक्षण केले.एकाच दिवसात तिघांचा मृत्यूराज्यात रविवारी ३ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात केईएममध्ये मुंबईच्या ६० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. त्याला प्रवासाचा इतिहास नव्हता. तर औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५८ वर्षीय बँक अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. या रुग्णाला प्रवासाचा इतिहास नव्हता. तर औंध येथे रविवारी दुपारी ७७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तिची नुकतीच पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाली होती.

देशात ५०५ नवे रुग्ण, ७ जणांचे बळीनवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूमुळे मरण पावलेल्यांची संख्या रविवारी ८३, रुग्णांची संख्या ४,२२४ तर गेल्या २४ तासांत कोविड-१९ चे ५०५ नवे रुग्ण नोंद झाले, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. गेल्या २४ तासांत आजाराने सात जणांचा मृत्यू झाला तर २७४ जण एक तर बरे झाले वा त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली. वृत्तसंस्थेने राज्यांच्या आकडेवारीच्या आधारे म्हटले की, देशात किमान ११० जणांचा मृत्यू झाला. ३,९५९ जण पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी ३०६ जण एक तर बरे झाले आहेत वा त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली गेली आहे.

70,000रुग्ण जगात वाढलेनवी दिल्ली : जगात गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत ७० हजारांनी वाढ झाली असून एकूण रुग्णांचा आकडा १२ लाख, ५४ हजार एवढा झाला आहे. एकूण मृतांची संख्या ६६ हजार, ५०० झाली असून सध्या ९ लाखांहून अधिक जणांवर उपचार सुरू आहेत. ब्रिटनमध्ये गेल्या २४ तासांत सुमारे ६ हजार नवे रुग्ण आढळले आणि मृतांच्या संख्येत ६२०ने वाढ झाली. तेथील मृतांचा आकडा ५ हजाराच्या घरात गेला आहे. अमेरिकेतील रुग्णांचा संख्याही ३ लाख, १५ हजारांवर गेली असली तरी २४ तासांत ८५० नवे रुग्ण आढळले. तेथील मृतांचा आकडा ८ हजार, ५००वर गेला आहे. अन्य देशांतील मृतांची संख्या पुढीलप्रमाणे इटली (१५,५००), स्पेन (१२,५००), फ्रान्स (७,६००) आणि इराण (३,६०३).

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या