शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

CoronaVirus: राज्यातील रुग्णांच्या संख्येत दिवसभरात १४५नं वाढ; कोरोनाग्रस्तांचा आकडा ६०० पार 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2020 9:49 PM

Coronavirus: राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ३२ जणांचा मृत्यू

मुंबई: राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्यानं वाढ होते आहे. आज दिवसभरात राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा तब्बल १४५ नं वाढला. सध्या राज्यात कोरोनाचे ६३५ रुग्ण असून यापैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. राजधानीत कोरोनाचे ३७७ रुग्ण असून त्याखालोखाल सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहेत. कोरोनामुळे मृत पावलेल्यांचा आकडा ३२ वर गेला आहे. मुंबईत कोरोनाचे तब्बल ३७७ रुग्ण आहेत. राज्यातील एकूण रुग्ण संख्येचा विचार केल्यास त्यातील ६० टक्के रुग्ण मुंबईत आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ३२ जणांचा मृत्यू झाला असून त्यातील २२ जणांचा मृत्यू मुंबईत झाला आहे. पुणे शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाचे ८२ रुग्ण असून मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा आणि जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे ७७ रुग्ण आहेत.राज्यात शनिवारी एकूण ७०८ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. तर आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १४ हजार ५०४ नमुन्यांपैकी १३,७१७ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ५२ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. सध्या राज्यात ४२ हजार ७१३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात अशून २ हजार १९३ संस्थात्मक अलगीकरण प्रक्रियेत आहेत.

दिल्लीत सहभागींपैकी ७३८ जणांना विलगीकरण कक्षातदिल्ली येथे पार पडलेल्या धार्मिक संमेलनातील १२२५ या राज्यातील नागरिकांपैकी १०३३ व्यक्तींशी संपर्क झाला असून त्यापैकी ७३८ जणांना विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. दिल्लीत सहभागींपैकी सात जण कोरोना बाधित आढळले आङेत. त्यात प्रत्येकी दोन पुणे, पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर, व एक जण हिंगोलीतील आहे.

बळींची संख्या ३२ वरकेईएममध्ये शनिवारी पाच मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यात मुंब्रा येथील ५७ वर्षीय पुरुषांचा शनिवारी केईएम रुग्णालयात मृत्यू झाला. या रुग्णास मधुमेह व उच्चरक्तदाबाचा आजार होता. निवृत्त बेस्ट वाहनचालक असणाऱ्या ६७ वर्षीय पुरुषाचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला, त्याला १० वर्षांपासून मधुमेह होता. केईएममध्ये ५३ वर्षीय पुरुषाचा शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला, निवृत्त मिल कामगार असणाऱ्या रुग्णाला परदेशी प्रवासाचा इतिहास नव्हता. याखेरीज, शुक्रवारीच ७० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला त्याने परदेशी प्रवास केला नव्हता. नायर रुग्णालयात शुक्रवारी सायंकाळी ४६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तिला फुफ्फुसाचा तसेच हृदयविकाराचा त्रास होता. मधुमेह असणाऱ्या या महिलेला हायपोथयारॅडिझम हा आजारही होता. अमरावती येथे जिल्हा रुग्णालयात ४७ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्या व्यक्तीस दम्याचा त्रास होता, त्यालाही परदेशी प्रवासाचा इतिहास नव्हता.

राज्यात कुठे किती रुग्ण-मुंबई- ३७७पुणे (शहर आणि ग्रामीण)- ८२सांगली- २५मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा आणि जिल्हे- ७७नागपूर, अहमदनगर- प्रत्येकी १७लातूर- ८बुलढाणा- ५यवतमाळ- ४सातारा, औरंगाबाद, उस्मानाबाद- प्रत्येकी ३कोल्हापूर, रत्नागिरी, जळगाव- प्रत्येकी २सिंधुदुर्ग, गोंदिया, नाशिक, वाशिम, अमरावती, हिंगोली- प्रत्येकी १

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस