मुंबई : राज्यात मंगळवारी ८४१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून रुग्णसंख्येने १५ हजार ५२५ चा आकडा गाठला आहे. तर दिवसभरात ३४ मृत्यू झाले असून बळींचा आकडा ६१७ वर पोहोचला आहे. कोरोनाच्या कठीण समयी दिलासाजनक बाब म्हणजे, राज्यात दिवसभरात ३५४ तर आतापर्यंत २ हजार ८९९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
मुंबईत मंगळवारी ६३५ रुग्णांचे निदान झाले असून रुग्णसंख्येने ९ हजार ९४५ चा टप्पा गाठला आहे. शहर उपनगरात दिवसभरात २६ मृत्यू झाले असून कोरोनाचे एकूण ३८७ बळी गेले आहेत. राज्यात नोंद झालेल्या ३४ मृत्यूंमध्ये मुंबईतील २६, पुण्यातील सहा, औरंगाबाद शहरात एक तर कोल्हापूरमधील एकाचा समावेश आहे. दिवसभरातील ३४ मृत्यूंपैकी २४ पुरुष तर १० महिला आहेत. ३४ मृतांपैकी ६० व ६० हून अधिक वय असलेले १४ रुग्ण आहेत. १६ रुग्णांचे वय ४० ते ५९ दरम्यानचे आहे. तर ४० जण ४० वर्षांखालील आहेत.डेटा क्लिनिंगमुळे आकड्यांत वाढकेंद्र सरकारच्या कोरोना (कोविड-१९) पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी दिलेल्या बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार माहिती देण्यात येते. तर राज्य शासनाचा अहवाल इंडियन क्लिनिकल मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)च्या माहितीनुसार करण्यात आला आहे. राज्यातील बृहन्मुंबई महानगरपालिका वगळता उर्वरित सर्व महानगरपालिका व जिल्ह्यांचे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार डेटा क्लिनिंग झाल्यामुळे आकडेवारीत वाढ झाली आहे.प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या आकडेवारीत बदल दिसून येतो आहे. राज्यात गेल्या २४ तासांत नव्याने ८४१ रुग्णांची नोंद झाली असून, यातील १४३ रुग्ण डेटा क्लिनिंग प्रक्रियेमुळे वाढले आहेत. आजपर्यंत पाठविलेल्या १ लाख ८२ हजार ८८४ नमुन्यांपैकी १ लाख ६७ हजार जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत. राज्यात १ लाख ९९ हजार १८२ जण घरगुती अलगीकरण प्रक्रियेत असून १२ हजार ४५६ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात ९४३ कंटेनमेंट झोन क्रियाशील आहेत.पांडू हवालदार नव्हे, पांडुरंग !बेस्टमध्ये चालक असलेल्या सचिन जाधव यांनी खारघर येथे पोलिसांच्या गणवेषात पांडुरंगाचे रूप धारण करून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन लोकांना केले.