मुंबई - देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. भारतात सध्याची स्थिती पाहता 3 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 16,000 च्या वर गेला आहे. तर आतापर्यंत 500 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे.
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 4483 वर पोहोचली आहे. सोमवारी (20 एप्रिल) राज्यात 283 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामध्ये मुंबईतील तब्बल 187 नव्या रुग्णांचा समावेश आहे. तर ठाण्यातही कोरोनाचे आणखी 21 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याची माहिती मिळत आहे. आज मुंबईत 187, ठाण्यात 21, वसई-विरार 22, पिंपरी-चिंचवडमध्ये 9, मीरा-भाईंदरमध्ये 7, भिवंडीत 1,कल्याण-डोंबिवलीमध्ये 16, नागपूर 1, नवी मुंबई 9, पनवेल 6, सातारा 1,सोलापूर 1 आणि रायगडमध्ये कोरोनाचे 2 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 283 वाढली आहे.
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनचे पालन करीत सोमवारपासून राज्यासह संपूर्ण देशभर काही उद्योग-व्यवसायांना सूट दिली आहे. आँरेज आणि ग्रीन झोनमध्ये काही अटींसह या सवलत मिळतील. रेड झोन व बाधित क्षेत्रात मात्र पूर्वीप्रमाणेच लॉकडाऊनची बंधने लागू असतील. राज्याप्रमाणे देशभरातही सोमवारपासून काही उद्योग-व्यवसायांना सूट दिली जाणार आहे. त्यामुळे जनजीवन काही प्रमाणात सुरळीत होण्यात मदत होईल.
जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 165,153 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 24 लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 2,414,098 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 629,390 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : देशातील 'या' झोनमधील नागरिकांना दिलासा! आजपासून कोणकोणत्या सेवा सुरू जाणून घ्या
धक्कादायक! ...अन् पोलिसाने स्वत:च्याच मुलांवर झाडल्या गोळ्या, एकाचा मृत्यू, तीन जण जखमी
Coronavirus : धोका वाढला! देशातील 'या' 10 जिल्ह्यांत कोरोनाचा कहर
Coronavirus : लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणाऱ्याला पोलिसांनी दिली अनोखी शिक्षा, Video पाहून कराल कौतुक
Coronavirus : कोरोनाची लक्षणे असलेल्या पतीला 4 रुग्णालयांनी नाकारलं, पत्नीने घरीच केले उपचार अन्...