शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

coronavirus: एकाच वेळी पेटल्या २३ चिता, मृतदेह एवढे की जमीन पडली कमी, मृत्यूचे भयावह चित्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 11:21 AM

Coronavirus in Maharashtra : कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत असल्याने स्मशानामधील दाहक चित्र या फोटोच्या माध्यमातून देशवासियांना दिसत आहे. असेच भयावह चित्र उस्मानाबादमधून समोर आले आहे.

उस्मानाबाद - देशात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे गंभीर परिणाम आता दिसू लागले आहेत. देशातील काही भागांतून भयावह फोटो समोर येत आहेत. काही ठिकाणी कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत असल्याने स्मशानामधील दाहक चित्र या फोटोच्या माध्यमातून देशवासियांना दिसत आहे. (Coronavirus in Maharashtra ) अशीच भयावह माहिती उस्मानाबादमधून समोर आली आहे. येथे एकाच वेळी २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र मृतदेहांचे प्रमाण एवढे अधिक होते की, त्यामुळे अंत्यसंस्कारांसाठी जागा कमी पडत आहे. (23 death body burnt at the same time, so many bodies that the ground fell less, a horrible picture in Osmanabad)

यासंदर्भातील वृत्त न्यूज १८ इंडिया हिंदी या संकेतस्थळाने प्रसिद्ध केले आहे. या वृत्तात देण्यात आलेल्या माहितीनुसार उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. येथे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या २३ जणांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या नातेवाईकांना अखेरचा निरोप देण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. सातत्याने येत असलेल्या मृतदेहांमुळे स्मशानभूमीतील व्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे काही मृतदेहांवर जमिनीवरच अंत्यसंस्कार करावे लागले.  मात्र असा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नाही. यापूर्वीही १४ एप्रिल रोजी १९ मृतदेहांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. उस्मानाबादमध्ये आतापर्यंत ६९१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यामध्ये कोरोनाचे ५८० नवे रुग्ण सापडले आहेत. तर २३ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे एकूण २८ हजार ९७८ रुग्ण सापडले आहेत.  

दरम्यान, महाराष्ट्रामध्येही काल पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ दिसून आली. महाराष्ट्रात काल दिवसभरात ६३ हजार ७२९ रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात ३९८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासातं ४५ हजार ३३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOsmanabadउस्मानाबादDeathमृत्यू