शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

CoronaVirus News: राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ९ लाखांच्या पुढे; दिवसभरात विक्रमी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2020 11:09 PM

CoronaVirus News: कोरोना रुग्ण वाढीचा धडकी भरवणारा वेग; गेल्या ६ दिवसांत १ लाख १४ हजारांहून अधिक रुग्ण सापडले

मुंबई– ऑगस्ट महिन्यात काही प्रमाणात नियंत्रणात आलेल्या राज्यातील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. सप्टेंबरच्या पहिल्या सहा दिवसांत राज्यातील दैनंदिन रुग्णवाढ हजारांच्या टप्प्यात वाढली आहे. १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत राज्यात तब्बल १ लाख १४ हजार ३६० रुग्णांची नोंद झाली असून ही अत्यंत चिंताजनक स्थिती आहे. राज्यात आज २३ हजार ३५० रुग्णांची नोंद झाली असून ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा ९ लाखांच्या पुढे गेला.राज्यात आतापर्यंत ९ लाख ७ हजार २१२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात कोरोनामुळे ३२८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर दिवसभरात ७ हजार ८२६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या राज्यात २ लाख ३५ हजार ८५७ जणांवर उपचार सुरू असून कोरोनावर मात केलेल्यांची संख्या ६ लाख ४४ हजार ४०० इतकी आहे.मुंबईत आता १ हजार ९१० कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे शहरातील कोरोना बाधितांचा आकडा १ लाख ५५ हजार ६२२ वर पोहोचला. आज मुंबईत ३७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा ७ हजार ८६६ वर पोहोचला. शहरात सध्याच्या घडीला २३ हजार ९३० जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १ लाख २३ हजार ४७८ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यातील ९११ जण आज बरे होऊन घरी परतले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस