मुंबई : मागील काही दिवसांत राज्यात दिवसभरात ३ हजार रुग्णांचे निदान होत होते. मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सर्वत्र वर्दळ वाढल्याने रुग्ण निदानाची संख्या वाढू लागली. राज्यात गुरुवारी दिवसभरात ४ हजार ८४१ रुग्णांचे निदान झाले, तर १९२ मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत दिवसभरातील हे सर्वाधिक निदान आहे. त्यामुळे राज्यातील रुग्णसंख्या १ लाख ४७ हजार ७४१ झाली असून, मृतांची संख्या ६,९३१ झाली आहे. सध्या राज्याचा मृत्यूदर ४.६९ टक्के असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.४२ टक्के आहे.राज्यात सध्या ६३ हजार ३४२ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. राज्यात दिवसभरात १९२ मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी १०९ मृत्यू मागील ४८ तासांतील आहेत. तर उर्वरित ८३ मृत्यू गेल्या कालावधीतील आहेत. या १०९ मृत्यूंमध्ये मुंबई ५८, ठाणे मनपा ३, नवी मुंबई १, भिवंडी निजामपूर १, मीरा भार्इंदर १, वसई विरार मनपा २, रायगड १, जळगाव ४, जळगाव मनपा १, पुणे १, पुणे मनपा १६, पिंपरी चिंचवड मनपा ४, सातारा १, औरंगाबाद १०, अकोला १, अकोला मनपा १, बुलडाणा १ आणि इतर राज्य/ देशातील २ मृत्यूंचा समावेश आहे.राज्यात दिवसभरात ३,६६१ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण ७७,४५३ जण ‘कोविड’मुक्त झाले आहेत. आजपर्यंत पाठविलेल्या ८ लाख ४८ हजार २६ नमुन्यांपैकी १७.४२ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ५६ हजार ४२८ रुग्ण लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ३३ हजार ९५२ संस्थात्मक क्वारंटाइनध्ये आहेत.वर्ध्यात सर्वांत कमी रुग्णराज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत असून, सर्वांत कमी रुग्ण वर्धा जिल्ह्यात असल्याचे दिसून आले आहे. वर्धा जिल्ह्यात केवळ १५ रुग्णांची नोंद असून अवघे तीन सक्रीय रुग्ण आहेत.
CoronaVirus: धोका वाढला! राज्यात दिवसभरात आढळले ४,८४१ रुग्ण; तर १९२ मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 4:28 AM